आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांशी मैत्री केवळ विकासाच्या कामापुरती : राधाकृष्ण विखे पाटील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
शिर्डी - ‘शिर्डी पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात मी माझ्या मतदारसंघाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांपुढे मांडून ते साेडविण्यास प्राधान्य दिले. मात्र यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांशी अापली जवळीक वाढल्याची चर्चा सुरू झाली अाहे. आमची मैत्री ही केवळ विकास कामांसाठी आहे. या मैत्रीचे कोणीही राजकीय भांडवल करु नये. राज्य सरकारच्या विरोधात मी कालही संघर्ष केला, उद्याही त्याच आक्रमकतेने भूमिका घेईल,’ असे स्पष्टीकरण विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
 
शिर्डीतील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या संभ्रमावर विखे म्हणाले, ‘माझ्या मतदारसंघातील सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न निळवंडे कालव्यांचा आहे. तसेच समन्यायी पाणी वाटप कायदा, गोदावरी कालव्यांचे नुतनीकरण, साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त होणाऱ्या विकासकामांसाठी सरकारकडे माझा अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. यासर्व कामांसाठी सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मी या कार्यक्रमात त्यांचे आभार मानले. मात्र या वक्तव्याचा  विपर्यास करण्यात अाला, ताे पूर्णपणे चुकीचा अाहे,’ असे विखे यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...