आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाषाढस्य प्रथम दिवसे संततधार! 46 टक्के झालेल्या पेरण्या आता पुढे सरकणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळची येळगंगा नदी अशी वाहू लागली आहे. - Divya Marathi
वेरूळची येळगंगा नदी अशी वाहू लागली आहे.
औरंगाबाद/पुणे - अाषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी मराठवाड्याच्या बहुतांश भागांत दमदार पाऊस झाला. त्यामुळे पेरण्या करून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात जुलैच्या सलामीचे तिन्ही दिवस मुसळधार पावसाचे ठरले. राज्यातील अनेक भागात नद्या दुथडी वाहू लागल्या व धरणांचे पाणीसाठेही वाढू लागले.
ग्रामीण भागात संततधार टिकून आहे. ४ आणि ५ जुलै रोजी राज्याच्या शहरी भागात पावसाचा जोर ओसरला, तरी ग्रामीण भागात संततधार टिकून आहे. धरणांची पाणलोट क्षेत्रे ओढे, झरे, नाले, तळी आणि धबधब्यांच्या ओसंडून वाहण्यामुळे धरणात पाणी आणत आहेत. आता कमी दाबाचे नवे क्षेत्र विकसित झाल्याने येत्या ४८ तासांत पुन्हा एकदा पावसाची बॅटिंग बहरण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद : ६६.५ मिमी
औरंगाबाद शहर व परिसरात मंगळवारी सकाळी साडेआठ ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ६६.५ मिमी पाऊस झाला. औरंगाबादेत यंदाच्या पावसाळ्यातील हा सर्वात मोठा पाऊस ठरला.
मराठवाड्यात पावसाळ्यातील पहिलाच मोठा पाऊस तोही सर्वदूर कोसळला. काही दिवसांपूर्वी केलेल्या पेरण्यांना जीवदान मिळाले असून पिण्याच्या पाण्याची टंचाईही यानिमित्ताने दूर होण्यास मदत मिळणार आहे.
औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, उस्मानाबादमध्ये दमदार पाऊस झाला. परभणीत तर सलग दुसऱ्या दिवशी पाऊस मेहेरबान होता. मराठवाड्यात आतापर्यंत केवळ ४६ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. या पावसाने लांबलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे.
उस्मानाबाद | पेरणी करून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला वरुणराजाने मंगळवारी काहीसा दिलासा दिला. उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत दुपारी चार वाजेच्या सुमारास दमदार पाऊस झाला. मंगळवारी दुपारी उस्मानाबादसह वाशी, तुळजापूर, भूम, परंडा भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. उस्मानाबादेत अर्धा तास झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले.
हिंगोली : मध्यम स्वरूपाचा
जिल्हाभरात ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सेनगाव, हिंगोली, औंढा नागनाथ तालुक्यात चांगला पाऊस झाला. याशिवाय कळमनुरी आणि वसमत तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सोमवारी सायंकाळी ८ ते मंगळवार सकाळी ८ वाजेपर्यंत हिंगोली जिल्ह्यात सरासरी १५.१४ मि.मी. नोंद झाली.
तालुकानिहाय झालेला पाऊस. (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस) : हिंगोली- ९.४३ (१७६.५८), वसमत – १९.४३ (२३३.६७), कळमनुरी – १४.०० (२९४.३०), औंढा नागनाथ – १०.१० (१९१.७५) , सेनगाव – २२.८३ (१८८.८१). आजपर्यंत पावसाची सरासरी २१७.०२ मिमी एवढी आहे.

लातूर : जिल्ह्यात पर्जन्यवृष्टी
लातूर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास सर्वदूर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. लातूर, चाकूर, रेणापूर, मुरूड, औसा, उदगीर आदी भागात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात मंगळवार सकाळपर्यंत सरासरी १६२.७७ मिमी झाला.
पुढे पाहा इतर जिल्ह्यांतील पावसाची स्थिती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...