आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यदर्शन झालेच नाहीः सलग दोन दिवसांपासून भिजपाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन तालुक्यात बुधवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. - Divya Marathi
भोकरदन तालुक्यात बुधवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता.
तब्बल दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी पुनरागमन केले. पुनरागमनचा हा भिजपाऊस दोन दिवसांपासून मुक्काम ठोकून आहे. कमी अिधक प्रमाणात मराठवाड्यातील बहुतांश भागात रिमझिम सुरू आहे. या पावसामुळे माना टाकलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. मृत साठ्यावर पोहोचलेला जायकवाडीचा साठा जिवंत झाला असून ५ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा पाऊस पिकांसाठी पोषक असला तरी टंचाईचे ढग मात्र अद्यापही कायम आहे. यासाठी मराठवाड्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
बीडमध्ये २४ तासांत ९.९ मिलिमीटर पाऊस
बीड - तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर बीड जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून संततधार पावसाला सुरुवात झाली. बुधवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरूच राहिली. पावसाचे पुनरागमन झाल्याने खरिपाच्या पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे. मंगळवारी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस माजलगाव तालुक्यात झाला आहे. या पावसाची आकडेवारी २०.८ एवढी आहे. बुधवारी सकाळपर्यंत मागील २४ तासांत ९.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.


जिल्ह्यात ६५ दिवसांत फक्त ११ दिवस पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ४ ऑगस्टपर्यंत १४२२.२ मिलिमीटर म्हणजे १२९.३ मि.मी. सरासरी पाऊस झाला होता. वार्षिक सरासरीच्या तुलनेत मंगळवारपर्यंत १३.२७ टक्केच पाऊस झालेला आहे. १ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील पावसाचे पर्जन्यमान ६६६.६३ मिलिमीटर आहे. यंदा १ जून ते ५ आॅगस्टपर्यंत ३११.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मंगळवारी दिवसभरात १०९.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस माजलगाव तालुक्यात झाला असून त्याची आकडेवारी २०.८ मिलिमीटर आहे. वडवणी तालुक्यात १५.५, त्या खालोखाल बीड, धारूर, परळी या तालुक्यांत १२ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. बुधवारी सकाळपर्यंत मागील २४ तासांत ९.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६६६.३६ आहे. १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात ९८.३ मिमी सरासरी पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत १४.७५ टक्केच पाऊस झाला आहे.
सलग ३६ तास बरसला
जालना- सलग ३६ तास बरसणाऱ्या वरुणराजाने शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा दिला असून शेतातील पिकेही माना डोलू लागली आहेत. या पावसाचा कापूस, सोयाबीन, मका, बाजारी या पिकांना चांगला फायदा होणार आहे. काही शेतकऱ्यांनी मागील १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर खते देऊन आंतरमशागतीची कामे केली होती, त्या पिकांची वाढ झपाट्याने होईल, असा अंदाज कृषी तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मंगळवारी ५४ मि.मी. एवढा पाऊस झाला तर बुधवारी दिवसभर रिमझिम सुरूच होती. या पावसामुळे ग्रामीण व शहरी भागातील चित्र पालटले असून बाजारपेठसुद्धा खुलण्याची चिन्हे आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, मराठवाड्यात कोठे किती बरसला पाऊस.... कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला यश मिळाल्याचा खडसेंचा दावा