आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजाेगाईत दंड, परळी न्यायालयाकडून जामीन, राज ठाकरे यांची काेर्टात हजेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - आठ वर्षांपूर्वी अंबाजोगाईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयातील तारखेला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हजर राहत नव्हते. चार महिन्यांपूर्वी त्यांचे अटक वॉरट निघताच शुक्रवारी ठाकरे यांनी दुष्काळी दौऱ्याच्या निमित्ताने अंबाजोगाईत हजेरी लावली. न्यायालयात जाऊन त्यांनी तीनशे रुपयांचा दंड भरत अटक वॉरंट रद्द केले. तसेच मनसे कार्यकर्त्यांनी धर्मापुरी नाका येथे बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी परळी न्यायालयाने जामीन दिला.

रेल्वे बोर्डात परप्रांतीयांचीच भरती केली जात असल्याने या भरतीच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना २००८ मध्ये अटक झाली होती. या अटकेचे पडसाद अंबाजोगाईतही उमटले होते. येथील मनसे कार्यकर्त्यांनी बसेसवर दगडफेक करून महामंडळाचे नुकसान केले होते. याप्रकरणी अंबाजाेगाई शहर पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात राज यांना जामीन मिळाल्यांनतर ते अंबाजोगाई न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे चार महिन्यांपूर्वी अंबाजोगाई न्यायालयाने त्यांच्यािवरुद्ध अटक वॉरंट काढले होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी पाऊण वाजता राज ठाकरे हे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. माने यांच्या न्यायालयासमोर हजर झाले. तेव्हा न्यायालयाने त्यांच्याकडून ३०० रुपये दंड भरून घेऊन त्यांचे अटक वॉरंट रद्द केले. अंबाजोगाई येथील न्यायालयात ठाकरे यांना पाहण्यासाठी गर्दी झाली हाेती.