आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाअाधीच शिऊरच्या शेकडो महिलांनी देशी दारूचे दुकान फोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झिंगाटवीरांना पिटाळले : महिलांनी रौद्ररूप धारण करून या दुकानाची तोडफोड केली, त्याच वेळी दारू सेवन करत असलेल्या झिंगाटवीरांना महिलांनी पिटाळून लावले. - Divya Marathi
झिंगाटवीरांना पिटाळले : महिलांनी रौद्ररूप धारण करून या दुकानाची तोडफोड केली, त्याच वेळी दारू सेवन करत असलेल्या झिंगाटवीरांना महिलांनी पिटाळून लावले.
अनेकांचे संसार देशोधडीला लावणाऱ्या देशी दारूच्या दुकानाविरोधात एल्गार पुकारणाऱ्या शिऊर गावात तीन वर्षांपूर्वी ग्रामसभेत ठराव घेतला होता. मात्र, या सभेची व्हिडिओ शूटिंग आणि महिला मतदारांच्या नोंदीचे नियोजन ग्रामपंचायतीकडून न झाल्याने उत्पादन शुल्क विभागाने देशी दारूचे दुकान हटवण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. दरम्यान, १ मे २०१७ च्या ग्रामसभेत पुन्हा दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. मात्र, तीन वर्षांपूर्वीचीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संतप्त ७० ते ८० महिलांनी या दुकानावर हल्ला चढवला.
 
शिऊर - महामार्गालगतचे बिअर बार बंद झाले असले तरी गावाशेजारील देशी दारूचे दुकान अजूनही सुरू असल्याने विदेशी पिणारे मद्यपी नाइलाजास्तव आता देशीकडे वळले आहेत. अगदी सहज मिळणाऱ्या देशीमुळे घराघरात महिलांना वादविवादाला सामोरे जावे लागत असल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी एल्गार पुकारत थेट शासनमान्य देशी दारू दुकानावरच दुपारी १२ वाजता हल्ला चढवत दुकानात तोडफोड करून टाळे ठोकले. तसेच दुकानातील बाटल्यांचे बॉक्स बाहेर काढत फोडले. आंदोलनानंतर महिलांनी थेट पोलिस ठाणे गाठून दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली. दरम्यान, तेथे असलेल्या मद्यपींना पिटाळून लावत दुकानावर ताबा मिळवत तोडफोड केली.  दुपारी चार वाजेनंतर मालकाने पुन्हा दुकान सुरू केले होते. सपोनि धनंजय फराटे यांच्या पथकाने सायंकाळी आठ वाजता पंचनामा करत दुकान बंद करण्याची वेळ झाल्याचे सूचित करून दुकान बंद करण्यास सांगितले.   
 
शिऊर येथील देशी दारूविक्री दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, अशी जुनी मागणी आहे. लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वच दारूचे सेवन करू लागले असल्याने अनेकांच्या संसारात कलह वाढला आहे. 
 
दारू दुकान बंद करण्यासाठी घोषणाबाजी 
संतप्त झालेल्या महिलांनी स्वयंप्रेरणेतून  दि ३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दारूविक्री करणाऱ्या दुकानावर मोर्चा काढून दुकानाची तोडफोड करून दुकानाला टाळे ठोकले, तर दारू दुकान परिसरात जाळपोळ करून दुकान पेटवण्याचादेखील प्रयत्न महिलांनी केला. यावेळी महिलांनी दारू दुकान बंद करा अशा जोरदार घोषणा देत दुकानावर हल्लाबोल केला. मुख्य बाजारपेठ असलेल्या शिऊरमध्ये देशी दारू परवानाधारकासह अवैद्य दारू सर्रासपणे विक्री केली जात असल्याने गावातील संतप्त झालेल्या ७० ते ८० महिलांनी दारूविक्रीविरोधात एल्गार पुकारत दुपारी बारा वाजेच्या सुमारास परवानाधारक दारूविक्री केंद्रावर हल्लाबोल केला.
 
महिलांचा एल्गार 
गावातील संतप्त झालेल्या ७० ते ८० महिलांनी दारूविक्री-विरोधात एल्गार पुकारत दुपारी बारा वाजेच्या सुमारास परवानाधारक दारूविक्री केंद्रावर हल्लाबोल केला.
 
सायंकाळी पंचनामा 
महिलांनी दुकानाला टाळे ठोकल्यावर चार वाजता दुकान उघडले होते. सायंकाळी पोलिसांनी पंचनामा करत दुकान बंद होण्याच्या वेळेची सूचना दिली.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
> तीन वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती होईल या भीतीने संतप्त महिलांचा हल्लाबोल
>वैजापूर- "वस्तीतील दारूचे दुकान हटवा'...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...