आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात 11 वर्षीय मुलीवर 60 वर्षांच्या वृद्धाचा बलात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी - बीड जिल्ह्यातील वडवणीपासून ९ किमी अंतरावर असलेल्या कोठारबन येथे साेमवारी सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान ११ वर्षीय शाळकरी मुलीवर ६० वर्षीय वृद्धाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस अाली.

वाघदरा नावाच्या शेताजवळ ही ११ वर्षीय शाळकरी मुलगी आपल्या लहान बहिणीसोबत जनावरे चारत होती. त्याच वेळी लक्ष्मण शामराव मुंडे (६०) हा त्या ठिकाणी आला व मुलीच्या लहान बहिणीला दहा रुपये देऊन पाणी आणण्यासाठी पाठविले. ११ वर्षीय मुलगी एकटी असल्याची संधी साधून वृद्धाने  तिच्यावर बलात्कार केला. मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने तिच्या आजोबाला हा प्रकार सांगितला. त्यांनी मुलीला घेऊन पाेलिस ठाणे गाठले व अत्याचाराची कैफियत पाेलिसांंसमाेर मांडली. या प्रकरणी पाेलिसांनी मुंडेविराेधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले अाहे. सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांनी मुलीचा जबाब घेतला अाहे.
पीडिता मुळची टाेकवाडीची. आई-वडील ऊस तोडण्यासाठी कारखान्याला गेल्याने ती कोठारबन येथील आजी-आजोबांकडे राहत होती.