आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी सातबारा बघा, नंतरच आरोप करा; 'गंगाखेड शुगर्स'चे रत्नाकर गुट्टे यांचे आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
परभणी - शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून फसवणूक केली, असे म्हणणाऱ्या पुढारी शेतकऱ्यांनी पहिले स्वतःचा सातबारा तपासून बघावा, त्यावर बोजा आहे का याची खात्री करावी, नंतरच आरोप करावेत, असे आव्हान गंगाखेड शुगर्सचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी बुधवारी (दि. ११) पत्रकार परिषदेतून केले.   
 
गंगाखेडमधील रामसीता सदन येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गुट्टे यांनी ३२८ कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात आपली बाजू मांडली. 
 
गुट्टे म्हणाले, माझ्यावर कर्ज प्रकरणात वेगवेगळे आरोप होत आहेत. ते आरोप हे नवीन नाहीत. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन मुद्दा काढून कारखाना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत असतात. गंगाखेड शुगर्स हा ४५० कोटी रुपये गुंतवणूक असलेला कारखाना आहे. यात ३३० कोटी रुपये हे कर्ज असून १२० कोटी रुपये वैयक्तिक व्यवसायातून टाकले आहेत. कारखान्याच्या माध्यमातून ऊस वाहतुकीसाठी १२५ ट्रक व ५० ट्रॅक्टर वाटप केले आहेत. महाराष्ट्र शासन व गंगाखेड शुगर्सच्या माध्यमातून गंगाखेड परिसरात १५१ बंधारे मंजूर केले आहेत. त्यापैकी ७०-८० बंधारे पूर्ण झाले आहेत. २००८ पासून कारखाना क्षेत्रात ऊस लागवड वाढली. उसाचे पैसे वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत शेतकरी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. 
 
मुंडे, केंद्रेंनीच गंडवले  
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यात जगमित्र साखर कारखाना उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी इसार देऊन खरेदीखत केले व उर्वरित रकमेचा धनादेश देऊन जमिनी हडपल्या. ते धनादेश न वटल्याने प्रकरण न्यायालयात आहे. आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी कित्येक बँकेस फसवले आहे व गंगाखेड शहरातील व्यापाऱ्यांचे पैसे घेऊन त्यांना गंडा घातला आहे, असे कारनामे करणारांनी माझ्यावर आरोप करू नयेत, असाही इशारा रत्नाकर गुट्टे यांनी या वेळी दिला.
बातम्या आणखी आहेत...