आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणमध्ये जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात, हजारो भाविकांची उपस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पैठण येथे रविवार (१९ एप्रिल) पासून स्वर्णिम तथा जन्मकल्याणक प्राणप्रतिष्ठा महोत्सवास सुरुवात झाली. सोमवारी भगवंताचा जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी अंतर्मना मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज व पीयूषसागरजी महाराज यांनी जन्मकल्याणकवर उपस्थित हजारो श्रावक-श्राविकांना प्रवचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

सोमवारी सकाळी ६.३० वाजता भगवंताची पूजा करण्यात आली. त्यानंतर गर्भकल्याणक पूजन, आदिकुमारचा जन्मोत्सव, मुनीश्रीचे मंगल प्रवचन, सौधर्म इंद्र -इंद्राणीकडून आदिकुमारला आणणे. हजारो डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहणे व भगवंताची गजरथातून शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायत्रा पांडूकशिलेवर विसर्जित करण्यात आली. यात श्राविकांनी केशरी साड्या परिधान करून डोक्यावर कळस घेतला होता, तर पुरुषांनी पांढरे वस्त्र परिधान करून शोभायात्रेत सहभाग घेतला होता. जन्मकल्याणक महोत्सवाच्या शुभदिनी भगवंताचे माता-पिता बनण्याचे सौभाग्य देवेंद्रकुमार जैन व स्नेहा जैन (दिल्ली) यांना मिळाले. कोलकाता येथील डॉ. राजेश जैन यांच्या परिवाराच्या वतीने मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज यांचे पादप्रक्षालन करण्यात आले.
अंधकार दूर केला
महिला आपल्या बाळाला जन्म देत असतात. गांधारीने १०० मुलांना जन्म दिला. पण शंभर पुत्र मिळूनही ते सृष्टीचे भले करू शकले नाहीत. परंतु तीर्थंकार भगवंताच्या आईने फक्त एकाच पुत्राला जन्म दिला. त्याने आपले ज्ञान व तपाने अंधकार दूर केला व तो विश्वाचे कल्याण करून गेला.
फोटो - पैठण येथे एका दांपत्याचा सन्मान करताना मुनीश्री प्रसन्नसागरजी महाराज.