आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उतम्याची ‘टीप’; गायकवाड गँगने टाकला दरोडा; गँगवर पाच जिल्ह्यांत गुन्हे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- माजलगाव तालुक्यातीलच रेकॉर्डवरचा जुना गुन्हेगार असलेल्या उतम्या उर्फ उत्तम गायकवाड याने दिलेल्या ‘टीप’ वरून भोकरदनच्या संजय गायकवाड याच्या टोळीने माजलगावचे माजी उपनगराध्यक्ष रामराज रांजवण यांच्या घरावर दरोडा टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. या टोळीने आतापर्यंत जळगाव, बुलडाणा, परभणी, सांगली भागात दरोडे, जबरी चोऱ्या केल्या आहेत. आता ही गँग बीडमध्ये सक्रिय झाली. दरम्यान, रेकी करून अन् नियोजनबद्ध पद्धतीने हा दरोडा टाकल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. 

माजलगावचे माजी उपनगराध्यक्ष रामराज रांजवण यांच्या घरावर पडलेल्या दरोडा प्रकरणात एलसीबी आणि शहर पोलिसांनी सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. ६० वर्षीय उत्तम गायकवाड (रा. केसापुरी वसाहत) हा या दरोड्याचा मास्टर माईंड असल्याचे समोर आले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उत्तम याच्यावर चोरी, जबरी चोरी, दरोड्याचे अनेक गुन्हे नोंद आहेत. तो पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे तर अवैध दारू विक्रीचाही तो व्यवसाय करतो. रांजवण यांच्या घरी दरोडा टाकता येऊ शकतो तिथे चांगला माल मिळू शकतो याचा उत्तमला अंदाज होता. त्याच्याकडे दारू पिण्याच्या निमित्ताने येणाऱ्या संजय गायकवाड बरोबर झालेल्या ओळखीतून त्याने त्याला ही बाब सांगितली. त्यानंतर एक दिवस उत्तमने टोळीतल्या दोन सदस्यांना सोबत घेऊन त्यांना रांजवण यांचे घरही दाखवले. त्यानंतर उत्तमच्या दारूच्या अड्ड्यावर संजय गायकवाड अन् त्याच्या सहकाऱ्यांनी दारू ढोसली आणि रामराज रांजवण यांच्या घरावर दरोडा टाकला. दोन जण घरात गेले तर तीन जण घराबाहेर थांबले अन् त्यांनी लाख रोकड अन् सोने लुटले. एलसीबी, माजलगाव शहर पोलिसांनी हा दरोडा उघडकीस आणला. 

भोकरदनची टोळी 
टोळी प्रमुख संजय गायकवाड याच्यावर चोरी, जबरी चोरी, दरोड्याचे पाच गुन्हे नोंद आहेत. संजय हा भोकरदनचा रहिवासी आहे तर भास्कर शिंदे, आण्णा शिंदे, अंकुश शिंदे, किरण जाधव हे मंगरूळ ता.मंठा जि.जालना येथील रहिवासी आहेत. जळगाव, बुलडाणा, जालना, बीड आणि सासुरवाडी असलेल्या परभणी जिल्ह्यातही त्याने हात साफ केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...