आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीवर आले तिघे, १४ मिनिटांत दुकान फोडले, लाखोंचा माल लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर- एकाच दुचाकीवर आलेल्या तीन चोरांनी चौदा मिनिटांत  सराफा दुकानाच्या एका बाजूचे लहान शटर तोडले.  दुकानातील तीन लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल रातोरात लांबवला. चोरीची ही सिनेस्टाइल घटना धारूर शहरातील मुख्य मार्गावरील रूपेश ज्वेलर्समध्ये शुक्रवारी मध्यरात्री १२.३८ मिनिटांनी घडली.  ती  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात  कैद झाली असून फुटेजमध्ये   दाेन चोरांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. सराफा दुकानदाराच्या तक्रारीवरून धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे सराफा व्यापाऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   

धारूर शहरातील मुख्य रस्त्यावर अभिजित रामचंद्र चिद्रवार यांचे रूपेश ज्वेलर्सचे दुकान  आहे. शुक्रवारी  मध्यरात्री १२.३८ मिनिटांनी तीन चोरांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. १२.५२ मिनिटांनी म्हणजे १४ मिनिटांत  दुकानातील तीन लाख साठ हजार  रुपयांचे सोन्या-चांदीची दागिने, नगदी २० हजार असा तीन लाख ८० हजार रुपयांचा ऐवज रातोरात लांबवला. याप्रकरणी  दुकान मालक अभिजित चिद्रवार यांनी धारूर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक धरमसिंग चव्हाण करत आहेत.  

चाेरी पाटोदा येथील घटनेशी मिळतीजुळती : दुकानावर पाळत ठेवून चोरांनी चोरी केल्याचा संशय  पोलिसांना आहे. पाच दिवसांपूर्वी पाटोदा येथे घडलेल्या चोरीच्या घटनेशी मिळतीजुळती असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुख्य रस्त्यावर हे सराफा  दुकान असल्याने चोरीच्या घटनेनंतर रस्त्याने पाच मिनिटांतच  दुकानाजवळून जाणाऱ्या  दोन जणांना हा प्रकार चाेरीचा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी दुकान मालक चिद्रवार यांना तुमचे दुकान उघडे कसे  आहे, असा फोन लावला. तेव्हा चिद्रवार हे  धावत दुकानाकडे आले. त्यांना एक छोटे शटर उघडे दिसले व दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
बातम्या आणखी आहेत...