आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एआरटीओ अधिकाऱ्याला घातला बेशरम फुलांचा हार; अखिल भारतीय युवा फेडरेशनची गांधीगिरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - वाहनांची योग्यता चाचणी ही आरटीओ कार्यालय परिसरातील ट्रॅकवर करणे गरजेचे असताना  उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे अखिल भारतीय युवा फेडरेशनने बुधवारी  गांधीगिरी करीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जाधव यांना बेशरमाच्या फुलांचा हार घातला.  

युवा फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष संदीप सोळुंके, सचिन देशपांडे, सय्यद अजहर, पवन कटकुरी, अनिल गोरे, बालाजी कदम, सचिन नरवडे, शेख सादेक, शेख निसार, शेख असद आदींसह कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन अधिकारी  जाधव यांना बेशरमाच्या फुलांचा हार घालून त्यांच्या कार्यपद्दतीचा निषेध नोंदवला.  आरटीओ कार्यालय परिसरात २५० मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅक उभारणी व बांधणी ही ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावी अन्यथा वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण चाचणी घेता येणार नसल्याचे उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या सुनावणीत म्हटले होते. परंतु येथील कार्यालयावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे युवा  फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी ही गांधीगिरी केली.  
बातम्या आणखी आहेत...