आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू तस्करांवर छापा; 40 ट्रॅक्टरसह अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मंगळवेढा  - सिद्धापूर येथील भीमा नदीतील वाळू ठिकाणांवर गुरुवारी (दि. ३)  पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या पथकाने छापा टाकला. अवैध वाळू उपसा व वाहतूक करणारे ४० ट्रॅक्टर,  दोन जेसीबी, १० ट्रकसह ६०० ब्रास वाळूसाठा असा दोन कोटी ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे या पथकाने  स्थानिक पोलिसांना सोबत न घेता ही कारवाई केल्याने ते यशस्वी झाल्याचे सांगितले जाते.  गुरुवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.    
 
भीमा नदीपात्रातून अनेक ठिकाणी बेकायदा वाळू उपसा होत आहे.  वाळू ठिकाणांचा लिलाव झाला नसतानाही वाळूमाफिया उघडपणे बेकायदा वाळू उपसा आणि वाहतूक करत होते. नदीपात्रासह या साठ्यांवरूनही वाळू वाहतूक केली जात होती. याविरोधात सिद्धापूूरसह अनेक गावातील ग्रामस्थ आणि  सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती.    
 
दरम्यान, पाेलिस अधीक्षकांचे विशेष पथक खासगी वाहनांतून भीमा नदीपात्रात दाखल झाले. पोलिस येताच वाळूमाफियांसह वाहनचालकांनी वाहने तेथेेच सोडून पळ काढला.  पोलिसांनी वाहनांसह मोठ्या प्रमाणात वाळूसाठा जप्त केला. 
बातम्या आणखी आहेत...