आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याची टंचाई, पाच ते सात रुपये लिटरने विकतचे पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गारज - बाभूळगाव खुर्द येथे उन्हाळ्याच्या प्रारंभीच भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. ग्रामस्थांसाठी गावात एक बोअरवेल अधिग्रहीत करून सुरू असलेला पाणीपुरवठा अपुरा पडत असून नळावर पाण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
 
वेळप्रसंगी ग्रामस्थांना पाच ते सात रुपये लिटर दराने पाणी विकत घ्यावे लागत असून बहुतांश वेळा पाण्यासाठी भटकंती होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार सुरू असताना पंचायत समिती उमेदवार अण्णा चौधरी यांनी मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी आठ दिवस गावात टँकर सुरू केले होते.
 
हंडा मोर्चा काढणार : आज गावात एक  बोअरवेल अधिग्रहीत केला असून त्याने  गावाला पाणीपुरवठा  केला जात असून ते  पाणी कमी पडत आहे.  आठ दिवसांत पिण्याच्या  पाण्याची व्यवस्था केली नाही तर तहसील कार्यालय वैजापूर येथे हंडामोर्चा काढणार असल्याचा इशारा सदस्य अलीम शेख,  गोरख तुपे यांनी  दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...