आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवली दंगल प्रकरणी 10 मिनिटांतच निकाल; एकास जन्मठेप, तिघांना 10 वर्षांची कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
जालना - तालुक्यातील सेवली येथील दंगल प्रकरणात दोषी २१ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. कोसमकर यांनी मंगळवारी शिक्षा सुनावली. यातील एकास जन्मठेप, तिघांना प्रत्येकी १० वर्षे तर उर्वरित १७ जणांना एक वर्ष शिक्षेसह १ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. १.३० वाजता आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर १ वाजून ४० मिनिटांनी हा निकाल देण्यात आला. 
 
अशी घडली होती घटना  
३ एप्रिल २००८ रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान सेवलीतील मुख्य बाजारपेठेत बाबासाहेब बंदुके यांच्या पान टपरीवर सुरू असलेल्या गाण्यावरून ही दंगल उसळली होती.

- गंभीर जखमी झालेल्या बळीराम जाधव व संतोष गवाळकर यांचा उपचारानंतर मृत्यू झाला होता.
- गंगाधर जाधव, राजू भालेकर, नारायण अकमार, मोहन तळेकर, पवन तळेकर जखमी झाले होते.
- या दंगलीदरम्यान झालेल्या दगडफेकीत अनेक दुकानांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.
४ एप्रिल : रुद्राप्पा मल्लीकार्जून तळेकर यांच्या तक्रारीवरून मंठा ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  
 
अशी ठाेठावली शिक्षा : आरोपींना ठोठावलेला दंड वसूल करुन तो घटनेतील जखमींना देणार
शेख ख्वाजा यास खून प्रकरणात जन्मठेप व ५ हजाराचा दंड तर अन्य कलमान्वये एक वर्ष शिक्षा व एक हजाराचा दंड दिला आहे. तसेच शेख युसूफ, शेख जुल्फेकार व शेख तस्लीम यांना प्रत्येकी १० वर्षे शिक्षा व ५ हजार दंडासह इतर कलमान्वये १ वर्ष शिक्षा व एक हजारांचा दंड सुनावण्यात आला आहे. शिवाय, इतर सर्व आरोपींना विविध कलमान्वये दोषी धरून एक वर्षाची शिक्षा व एक हजार रूपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला. दरम्यान, नमुद आरोपींना उच्च न्यायालयात अपील करता येईल, असेही न्यायालयाने म्हटले. यात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. संजीव देशपांडे यांनी काम पाहिले तर अॅड. देशपांडे व अॅड. घुगे यांनी त्यांना सहकार्य केले. 
 
यांना सुनावली शिक्षा
-शेख अजीम शबीर कुरेशी, शेख ख्वाजा शबीर कुरेशी, अगाखान यासीनखा पठाण, शेख बाबा शेख शबीर कुरेशी, शेख सादीक बाबु शेख गणी, खालेद अमीरोद्दीन काझी, जमीरोद्दीन यमिरोद्दीन काझी, शेख रियाज शेख गणी, शेख जब्बार शेख दाऊद, शेख मेहबूब पिर महंमद, अबरार खा यासीन खा पठाण, ईलायस खा अहेमद खा पठाण, शेख सईद शेख मलंग पटेल, शेख युसूफ शेख इब्राहीम, अब्दुल रशीद अब्दुल अझीज, शबीर रझाक कुरेशी, शेख जुल्फेकार शेख मुनाफ, शेख रशीद शेख लाल, शेख युनूस शेख लालामियाँ तांबोळी, शेख तस्लीम शेख रशीद, शेख गौस शेख बाबुलाल कुरेशी
 
अपिलाचा प्रस्ताव पाठवू
या निर्णयाने अाम्ही अंशत: समाधानी आहोत.  सुटलेल्या तसेच कमी शिक्षा झालेल्या आरोपींविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवू. 
-अॅड. संजीव देशपांडे, विशेष सरकारी अभियोक्ता.
 
हे पण वाचा,
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...