आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबरदस्तीने बालविवाह करून जन्मदात्या आईनेच घडवून आणले लैंगिक शोषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूम- तालुक्यातील वालवड येथे जन्मदात्या आईनेच स्वतःच्या १४ वर्षीय मुलीचा जबरदस्तीने बालविवाह करून तिचे लैंगिक शोषण घडवून आणल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून आईसह सात जणांविरोधात भूम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  

याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वडील मयत झाल्याने आजी सोबत वालवड येथे राहत आहे. तिची आई व लहान बहीण वडाचीवाडी येथे राहतात. पीडित मुलगी ८ जुलै रोजी दुपारी १ वाजता शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना वालवड येथील बाजार तळाजवळ थांबलेल्या तिच्या आईने तिला सोबत नेले.  १० जुलै रोजी एका घरी  कैलास मोहन माने याने मुलीला व तिच्या मावस बहिणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून बीड येथील एका ओळखीच्या घरी नेले. तेथून बीडकडे जाताना पीडितेच्या मावस बहिणीला कपिलधारवाडी येथे रस्त्यातच सोडले.  ११ जुलै रोजी पीडितेची आई व चार जणांनी    बीड येथील एका मंदिरात पीडितेचा जबरदस्तीने कैलास माने याच्याशी बालविवाह लावला.  वडाजीवाडी येथे  कैलासने पीडितेशी बळजबरी केली. त्याला कैलासच्या आईने मदत केली. हा सर्व प्रकार पीडितेने तिच्या आजीला सांगितला. त्यानंतर आजी व चुलत्याने वडाजीवाडी येथे जाऊन पीडितेला सोबत घेत भूम पोलिस ठाणे गाठले व तक्रार दिली. 
बातम्या आणखी आहेत...