आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांसमोरच पंकजा मुंडेंचे जयंत पाटलांना भाजपमध्‍ये येण्‍याचे आमंत्रण, पवार काय म्‍हणाले..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव (बीड) - भाजप सरकार सत्तेवर आले तरी अच्छे दिन आले नाहीत. खऱ्या अर्थाने अच्छे दिन २०१९ मध्ये येणार आहेत. त्यामुळे प्रकाश सोळंके यांनी पराजयाकडे लक्ष देऊ नये, असे माजी अर्थमंत्री जयंत पाटील भाषणात म्हणताच, हाच धागा पकडून मंचावर असलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी जयंत पाटलांना उद्देशून बोलत “अच्छे दिन येण्यासाठी २०१९ ची वाट पाहू नका, तुम्ही व प्रकाशराव इकडे या, तुम्हाला अच्छे दिन लवकरच दाखवू,’ असे सांगून खुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासमाेर पाटील यांना भाजपत येण्याचे निमंत्रण दिले.

तेलगाव येथील साखर कारखान्यावर शनिवारी दुपारी लोकनेते सुंदरराव सोळंके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंकजा मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी अर्थमंत्री जयंत पाटील उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत प्रकाश सोळंके यांचा पराभव झाला, परंतु पराजयाने खचायचं नसतं आणि विजयानं हुरळून जायचं नसतं. आता २०१९ मध्ये अच्छे दिन येणार आहेत. प्रकाशराव, तुम्ही खचू नका. पंकजा मुंडे यांचे काम चांगले आहे. मात्र मंत्रिमंडळात त्यांची चलती कमी आहे. आमचे सरकार होते तेव्हा शेततळ्यांसाठी ६ लाख रुपयांचे अनुदान होते, ती ६ लाखांची योजना ५० हजारांवर आणली, अशी पाटील यांनी कोपरखळी मारली. आता पंकजा यांनीच लक्ष देऊन ती योजना ५० हजारांवरून वाढवावी. शेतकऱ्यांना द्यायच्या वेळेस सरकारने मोजून-मापून देण्याचे बंद करावे, असेही पाटील भाषणात म्हणाले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पंकजा नेमक्‍या काय म्‍हणाल्‍या आणि पवारांनी काय उत्‍तर दिले..

बातम्या आणखी आहेत...