आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी : 25 हजारांची देणगी; चांदीचे साईनाणे भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
शिर्डी  - श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुहूर्तावर पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते व संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या उपस्थितीत संस्थानला रुपये २५ हजार व त्यापुढील देणगी देणाऱ्या साईभक्तांना २० ग्रॅम वजनाच्या साईपादुका असलेले चांदीचे नाणे देण्याचा शुभारंभ करण्यात आला.पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते केनियातील देणगीदार सलीम फातिमा फराह यांना चांदीचे नाणे देण्यात अाले.
बातम्या आणखी आहेत...