आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतूर: शिवजयंती मिरवणुकीवर दगडफेकीनंतर तणावपूर्ण शांतता, जमावबंदी, बंदमुळे व्यवहार ठप्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतूरमध्ये सोमवारी सकाळी बहूुतांश दुकाने बंद असल्याची परिस्थिती पाहायला मिळाली. - Divya Marathi
परतूरमध्ये सोमवारी सकाळी बहूुतांश दुकाने बंद असल्याची परिस्थिती पाहायला मिळाली.
परतूर (जालना) - शिवजयंती मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी शहरात जमावबंदी आदेश लागू केला.शहरातील सर्व शाळा- महाविद्यालये, बँका, दुकाने बंद होती. मुख्य रस्त्यावर शुकशुकाट होता. व्यवहार ठप्प असल्याने मजुरांबरोबरच फेरीवाले, दूधवाले यांचे नुकसान झाले.   
 
अतिरिक्त पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शहरात नुकसान झालेल्या ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली परतूर येथील गाव भागात  १९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शिवजयंती मिरवणुकीवर अज्ञात लोकांकडून दगडफेक केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. 
 
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रेल्वे गेट चौकातून शिवजयंती मिरवणुकीला सुरुवात झाली होती. मिरवणुकीमध्ये जवळपास दोन हजारांवर तरुण झाले होते. शहरातील महादेव चौक, पोलिस चौकी, शिवाजी नगर, विश्रामगृह मार्गे मिरवणूक पोलिस ठाणे चौकातून दसमले चौकात येताच किरकोळ कारणांवरून वाद निर्माण झाला होता.
 
आयजी-पोलिस अधीक्षक परिस्थितीवर लक्ष ठेवून 
जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह रात्री अकरा पासून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आयजी अजित पाटील यांनी रात्री एकच्या सुमारास परतूर शहरात पाहणी केली. सोमवारी दुपारी चार वाजता शहरातील सर्व समाजबांधवाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या घटनेत शहरातील गावभागातील मुख्य रस्त्यावरील 20 दुकाने जळून खाक झाली. यामध्ये अंदाजे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 10 मोटारसायकल, रिक्षा, काही फोर व्हिलर यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर 40 ते 50 युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
रविवारी काय घडले...
परतूर येथील गावभागात रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शिवजयंती मिरवणुकीवर जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रेल्वेगेट चौकातून शिवजयंती मिरवणुकीला सुरुवात झाली होती.
 
 मिरवणुकीमध्ये जवळपास दोन हजारांच्या वर तरुण सहभागी झाले होते. शहरातील महादेव चौक, पोलिस चोकी, शिवाजीनगर, विश्रामगृहमार्गे मिरवणूक गावभागातील पोलिस स्टेशन चौकातून दसमले चौकात येताच काही किरकोळ कारणांवरून वाद निर्माण झाला व काही कळण्याच्या आत दगडफेक होण्यास सुरुवात झाली. 
 
अचानक झालेल्या दगडफेकीमुळे मिरवणुकीत सहभागी असलेला जमाव व बघणारा जमाव अचानक सैरभैर झाला. परिस्थिती जास्त चिघळत असल्याचे पाहून जमावाने रोडवर असलेल्या दुकानांना आपले लक्ष्य बनवले. गावभागातील पोलिस स्टेशन  चौक ते मशीद चौकदरम्यानच्या अनेक दुकानांची जमावाने तोडफोड करून जाळपोळ केली. 
 
पोलिस स्टेशनच्या अगदी समोर असलेल्या सरताज टी हाऊस, सरगम टेंट हाऊसला जमावाने आग लावली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, या घटनेमुळे परतूर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

असा उडाला भडका...
- 1992 पासून शांत असलेल्या परतूर शहरात रविवारी भडका उडाला. शिवाजी महाराज जयंती मिरवणूक मलंगशहा चौकात आली तेव्हा वरती बांधलेल्या पताकाला धक्का लागल्याच्या कारणावरुन दगडफेक सुरु झाली. 
- दोन्ही समाजांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. वातावरण चिघळत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 
- मीडिया रिपोर्टनुसार, दोन्ही बाजूंचा जमाव आक्रमक झाल्यानंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळावरुन पळ काढल्याने दंगल आणखी पेटली. 
 
अघोषित संचारबंदी 
- पोलिस स्टेशन समोरील टी हाऊस आणि टेंट हाऊसला जमाने लक्ष्य केले होते. अनेक टपऱ्यांची जाळपोळ करण्यात आली. 
- सध्या शहरात अघोषित संचारबंदी लागू असून राज्य राखीव पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...