आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: विदर्भवाद्यांना शिवसैनिकांची मारहाण; अमरावतीत मनसे कार्यकर्त्यांनी तोडल्या खुर्च्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वतंत्र विदर्भ अखंड महाराष्ट्रावरून साेमवारी अकोल्यात विदर्भवादी शिवसैनिक असे अामने-सामने अाले. दाेन्ही बाजूने प्रचंड घाेषणाबाजी झाली - Divya Marathi
स्वतंत्र विदर्भ अखंड महाराष्ट्रावरून साेमवारी अकोल्यात विदर्भवादी शिवसैनिक असे अामने-सामने अाले. दाेन्ही बाजूने प्रचंड घाेषणाबाजी झाली
अकोला/अमरावती/नागपूर - वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी साेमवारी महाराष्ट्र दिनी विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकाेला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा जिल्ह्यांत विदर्भवाद्यांसह विविध संघटनांच्या वतीने ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’, अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. अकोल्यात शिवसैनिकांनी विदर्भवाद्यांना मारहाण केली तर अमरावतीत मनसे कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक केली अखंड महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. 
 
अकोल्यातील अांदाेलनादरम्यान शिवसैनिकांनी विदर्भवाद्यांना मारहाण केली. त्यामुळे विदर्भवाद्यांचे अांदाेलन पूर्ण हाेऊ शकले नाही. या मारहाणीत काेणीच जखमी झाले नाही. या वेळी विदर्भवादी शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. परिणामी परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला हाेता. पोलिसांनी शिवसैनिक विदर्भवाद्यांना ताब्यात घेतले. विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे मदनलाल धिंग्रा चाैकातील ब्रजलाल बियाणी यांच्या पुतळ्याजवळ अांदाेलन करण्यात आले. बियाणी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करताच तेथे शिवसैनिक दाखल झाले. काही क्षणातच दाेन्ही बाजूने घोषणायुद्ध सुरु झाले. विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीच्या घाेषणा दिल्या तर शिवसैनिकांनी अखंड महाराष्ट्राच्या समर्थनार्थ आक्रमक पवित्रा घेतला. दाेन्ही बाजूने धक्काबुक्की झाली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. नंतर शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. अांदाेलनाला हिंसक वळत लागण्याचे चिन्ह दिसताच पोलिसांची
जादा कुमक घटनास्थळी बोलावली. 
 
यवतमाळ- नागपूर मार्गावर रास्ता रोको : यवतमाळ शहरात विविध कार्यक्रमांसह महाराष्ट्र दिन साजरा होत असताना नेताजी मार्केट परिसरात विदर्भ अन्याय निवारण समितीने काळे झेंडे फडकवले. त्याचबरोबर स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देत यवतमाळ- नागपूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. विदर्भ राज्य आघाडी (वीरा) तर्फे आज शहरातील पाच कंदील चौकातील लोकनायक बापूजी अणे यांच्या पुतळ्यासमोर विदर्भ ध्वज फडकवण्यात आला. या वेळी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करत घोषणाबाजी केली. वणी येथील बापूजी अणे चौकात सोमवारी सकाळी वाजता विदर्भ वाद्यांनी विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भाचा ध्वज फडकवला. गोंडवाना विदर्भ राज्य घोषित करण्यात यावे, या प्रमुख मागण्यासाठी गोंडवाना संग्राम परिषद, गोंडवाना गणतंत्र पार्टीसह अनेक आदिवासी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला. शहरातून मार्गक्रमण करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते. मलकापुरात काळ्या फिती लावून निषेध शासनाचा निषेध करण्यात आला. 
 
माती,लिंबू फेकले 
अकोल्यातविदर्भ केसरी ब्रजलाल बियाणी यांच्या पुतळ्याच्या दिशेने काही शिवसैनिकांनी माती लिंबू फेकले. मात्र, सुदैवाने ते पुतळ्यापर्यंत पाेहाेचले नाही. त्यामुळे विदर्भवादी आक्रमक झाले. अाणखी परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत शिवसैनिकांना हुसकून लावले. 
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, अमरावतीत विदर्भवाद्यांच्या पेंडाॅलमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा धुडघूस, खुर्च्या तोडणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध गंभीर गुन्हे...  
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...