आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येलदरी घटनेच्या निषेधार्थ सेलूत काढला मूक मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलू - येलदरी (ता. जिंतूर) येथे वारकरी संप्रदायातील महाराजांना काही युवकांकडून झालेल्या शिवीगाळ व मारहाणीच्या निषेधार्थ सेलूत बुधवारी सकाळी मूक मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला. यादरम्यान, शहरातील बहुतांश व्यावसायिकांनी आपली दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवून वारकरी संप्रदायाला पाठिंबा दर्शवला.  

क्रांती चौक परिसरातून निघालेला मूक मोर्चा जवाहर रोड, गोंविद बाबा चौक, रेल्वे स्टेशन, बसस्थानकमार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला. या वेळी अनेकांनी मनोगते व्यक्त करत मोर्चाचा समारोप केला. नायब तहसीलदार नीलेश पळसकर यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत स्वीकारले. 
बातम्या आणखी आहेत...