आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर वारकऱ्यांचा टेम्पो अन‌् कारची समोरासमोर धडक; 40 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशी  - सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी (दि.०९) सायंकाळी सहा वाजता पारगावजवळील रुई पाटी नजीक वारकऱ्यांचा टेम्पो व कारची समोरासमोर धडक होऊन ४० वारकरी जखमी झाले. हा टेम्पो पंढरपूर येथून जालन्याकडे जात होता.   
 
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी जालना येथून पंढरपूरला आलेले वारकरी रविवारी (दि.०९) पंढरपूर येथून जालन्याकडे परतीला निघाले होते. टेम्पो पारगावजवळ आल्यावर रुई पाटी येथे टेम्पो व बीडकडून उस्मानाबादकडे जाणाऱ्या कारची समोरासमोर जोरात धडक झाली. जखमींना नागरिकांनी मदत करून वाशी तालुक्यातील पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचार करून जखमींना पुढील उपचारासाठी बीडला पाठविण्यात आले.    
 
यामध्ये कौशल्या सागडे (६५), कस्तुराबाई सातपुते (६५), नंदा सातपुते (४०), मीना सागडे (५०), सुमनबाई सागडे (६०),  सुंदरबाई ढेपे (५५),  सुनीता सातपुते (४०), अंजली सातपुते (४०), दीपक सागडे (२५), गणेश सागडे (१४), अशोक काळे (४०),  आबा काळे (१४),  भिकाजी नागवे (५०), भागवत नागवे (३८), श्रीराम येवले (३५), अंकुश सातपुते (४५), दिगंबर सागडे (३८), वनिता सागडे (३०), मोहन सागडे (०५), सुरेश सागडे (४०), सुरेश सातपुते (४०), महेश सातपुते (१५) चत्रभुज सातपुते (५०), भानुदास दाहीत (४०), हरिभाऊ सागडे (३५), बळीराम कुरकुटे (२५), कल्याण सातपुते (३०), बळीराम सातपुते (३५) हे सर्व गंभीर जखमी झाले आहेत. हे वारकरी सिद्धेश्वर पिंपळगाव ( ता. घनसावंगी, जि.जालना) येथील असल्याची माहिती मिळाली आहे. कारमध्ये नागपूर येथील चष्मा व्यापारी संजय नेनवानी ( ४८) आणि त्यांच्याबरोबर कारमध्ये असलेले नजीम कलाम (२८) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...