आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरऊर्जेतून भारनियमनावर मात, शेतं पिकली सोन्यावानी, माळरानावर पिके बहरली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौरऊर्जेच्या मदतीने शेतीला पाणी पुरवठा करण्यात येत आहे. - Divya Marathi
सौरऊर्जेच्या मदतीने शेतीला पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
भूम - तालुक्यातील तिंत्रज येथील संतोष मनोहर साबळे या शेतकऱ्याने सौरऊर्जेच्या मदतीने सततच्या भारनियमनावर मात करून २० एकर शेती फुलविली आहे. साबळे यांनी दोन महिन्यांपूर्वी आपल्या शेतातील विहिरीजवळ अटल सौर कृषिपंप योजनेंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प उभारला.
   
तिंत्रज-सोनेगाव रोडवर संतोष साबळे यांची २० एकर कोरडवाहू जमीन आहे. त्यांनी ७० फूट विहीर खोदल्यावर मुबलक पाणी लागले, परंतु विहिरीपासून एक हजार फूट अंतरापर्यंत महावितरणचे विजेचे खांब नसल्यामुळे विद्युतपंप कसा बसवावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. त्यांनी महावितरणकडे त्यांची अडचण मांडली. विहिरीपासून एक हजार फुटापर्यंत विजेचे खांब नसलेल्या ठिकाणी आम्ही सौरऊर्जा प्रकल्पास परवानगी देतो, असे महावितरणने त्यांना सांगितले. यानंतर वायरमनने सर्वेक्षण केले. साबळे यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. यानंतर साबळे यांनी अटल सौर कृषिपंप योजनेंतर्गत महिनाभरात सौर प्रकल्प उभारला. यासाठी त्यांना ३५ हजार रुपये खर्च आला.  
 
पीक नियोजनातून उत्पन्नवाढ : या प्रकल्पावर ५ अश्वशक्तीपर्यंतच्या पॉवरची विद्युत मोटार चालत असून कमीत कमी ८००० फूट लांब पाणी फेकले जाते. दिवस उजाडल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत हा प्रकल्प सुरू होतो. यामुळे साबळे यांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतामध्ये पिकांचे नियोजन शक्य झाले आहे.
 
भारनियमन, विजेची चिंता मिटली २० एकरला पाणी
साबळे यांची भारनियमन आणि विजेची चिंता मिटली आहे. दिवस उजाडल्यापासून ते मावळेपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय ते २० एकर जमिनीस पाणी देत आहेत.  
 
नियोजनानुसार ओलित शक्य    
- सौरपंपामुळे मला २० एकर पिकांच्या नियोजनानुसार पाणी देणे शक्य झाले आहे. भारनियमनाची चिंताही मिटली आहे.
-संतोष साबळे, शेतकरी, तिंत्रज
बातम्या आणखी आहेत...