आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनदायिनी : अपघाताच्या सुवर्ण तासातील आपत्कालीन वैद्यकीय सेवेची हॅट‌्ट्रिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. माले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. - Divya Marathi
रविवारी १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. माले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
उस्मानाबाद - अपघातानंतर पहिल्या सूवर्ण तासामध्ये जखमींना वैद्यकीय मदत पोहोचवून त्यांच्यासाठी जीवनवाहिनी ठरलेल्या आपत्कालीन वैद्यकीय १०८ च्या सेवेला उस्मानाबाद जिल्ह्यात दि. मे रोजी वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान या सेवेंतर्गत कार्यरत १५ रुग्णवाहिकांनी या तीन वर्षात एकूण २७ हजार ४८९ अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे. या हॅट््ट्रिक पूर्तीनिमित्त रविवारी (दि. ७) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांच्या हस्ते सदरील १०८ रुग्णवाहिकेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. 
 
या वेळी स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल वाघमारे, डॉ. प्रकाश शेलार, ईएमएस समन्वयक जयराम शिंदे, जिल्हा व्यवस्थापक डॉ. किरण गरड, ईएमएसओ डॉ. कावळे, पायलट इंगळे आदींची उपस्थिती होती. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक मे २०१४ रोजी आपत्कालीन वैद्यकीय सेवा १०८ च्या सेवेला सुरुवात झाली. जिल्ह्यामध्ये सध्या १५ अत्याधुनिक रुग्णवाहिका कार्यरत आहेत. आपघातग्रस्तांना पहिल्या सुवर्ण तासामध्ये तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात या १०८ च्या सेवेअंतर्गत रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोलाची मदत होत आहे. या सेवेच्या यशस्वी अंमलबाजवणीसाठी नगरपालिका, पोलिस यंत्रणा, अग्निशमन दल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्वयंसेवी संस्था या सर्वांशी समन्वय साधण्यात येत आहे. तातडीची सेवा पुरविण्यासाठी रुग्णवाहिकेमध्ये अत्याधुनिक सुविधा दिलेल्या आहेत. या योजनेंतर्गत अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट बेसिक लाइफ सपोर्ट अश्या प्रकारच्या रुग्णवाहिका देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आलेली आहेत. प्रशिक्षित डॉक्टर प्रशिक्षित वाहन चालक या सेवेमध्ये कार्यरत आहेत. जास्तीत जास्त लोकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी केले आहे. 

आपत्कालीन सेवेत तातडीने वैद्यकीय मदत : जिल्ह्यात१०८ ची रुग्णवाहिका सुरू झाल्यापासून शेकडो रुग्णांचे प्राण वाचले असून हजारो अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदत पोहचविण्यात यश आले. अपघातबरोबरच आशा कार्यकर्तीकडून १०८ क्रमांकावर फोन करून प्रसुतीसाठी रुग्णालयात घेऊन जायचे आहे, असा निरोप आल्यावर ही रुग्णवाहिका ग्रामीण तसेच शहरी भागातही तातडीने पोहोचून सदरील गर्भवती महिलेला रुग्णालयात घेऊन येते. 
 
१५ रुग्णवाहिकांद्वारे वैद्यकीय सेवा 
या योजनेंतर्गत जिल्ह्यात १५ अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज रुग्णवाहिका कार्यरत आहेत. या रुग्णवाहिका सध्या उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय, तुळजापूर, उमरगा, परंडा उपजिल्हा रुग्णालय, मुरूम, वाशी,भूम,लोहारा,कळंब या ग्रामीण रुग्णालयात तसेच अणदूर, जळकोट, येडशी, येरमाळा,बेंबळी, शिराढोण या प्राथमिक आरोग्य केंद्रात या रुग्णवाहिका कार्यरत आहेत. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...