आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड : अश्लील चाळे करणाऱ्या क्रीडा शिक्षकाला कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नांदेड - राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळविण्याचे आमिष दाखवून अमृतसर येथून नांदेडमध्ये आणून विद्यार्थ्यांशी अश्लील चाळे करणारा क्रीडा शिक्षक सतविंदरसिंग सिद्धू याची येथील जिल्हा न्यायालयाने २१ जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.  
 
अमृतसर येथील सतविंदरसिंग सिद्धू  (४०) याची अमृतसर येथे स्पोर्ट अकॅडमी आहे. अनके  विद्यार्थी त्याच्याकडे प्रशिक्षणासाठी येतात. सिद्धू याने १३ विद्यार्थ्यांना तुम्हाला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मी घेऊन जाणार आहे, असे सांगितले आणि त्यांच्या पालकांकडून प्रत्येकी आठ हजार रुपये घेतले. अमृतसर येथून दिल्ली आणि दिल्लीनंतर नांदेड असा प्रवास या विद्यार्थ्यांना घेऊन सिद्धू याने केला. या प्रवासादरम्यान त्याने काही विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे केले.
बातम्या आणखी आहेत...