आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्रमशाळेवर दगडफेक, विद्यार्थी व पालकांचा संताप, 12 जखमींपैकी नऊ पोलिस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - साळवाडी (ता. भोकर) येथील श्री संत गाडगेबाबा आदिवासी आश्रमशाळेवर शनिवारी सायंकाळी पाच वाजता विद्यार्थी व पालकांनी जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत संस्थेचे तीन कर्मचारी व 9 पोलिस जखमी झाले. जखमीत भोकरचे पोलिस निरीक्षक जी.जी. रांजणकर यांचाही समावेश आहे. संस्थाचालक व विद्यार्थ्यांमध्ये सुरू असलेला वाद उफाळल्यामुळे हे प्रकरण घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

14 ऑगस्ट रोजी संस्थेतील एका विद्यार्थिनीचे पोट दुखू लागले. संस्थेतील कर्मचार्‍यांनी तिला भोकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार केल्यानंतर तिला घरी पाठवण्यात आले. विद्यार्थ्यानी संस्थाचालक बालाजी शिंदे यांना याबाबत जाब विचारला. तेव्हा स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असल्याचे कारण सांगून त्यांनी विद्यार्थ्याना उत्तर देण्यास टाळाटाळ केली. संस्थाचालक व विद्यार्थ्यात काही दिवसापांसून छोट्या-मोठ्या कारणावरून वाद सुरू आहे. या निमित्ताने तो उफाळून आला. विद्यार्थ्यानी शनिवारी आपल्या पालकांना बोलावून घेतले. दुपारी पालक, विद्यार्थी व संस्थाचालकात चर्चा सुरू असतानाच वाद विकोपाला गेला. संस्थाचालक व मुख्याध्यापकासोबत चर्चा सुरू असतानाच बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांनी आरडाओरड करीत आश्रमशाळेवर दगडफेक सुरू केली. भोकरचे पोलिस निरीक्षक फौजफाट्यासह घटनास्थळी होते. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु संतप्त जमावाने पोलिसांनाही लक्ष केले.

जखमींची विचारपूस
दगडफेकीत पोलिस निरीक्षक जी.जी.रांजणकर, जमादार लहुजी काळे, महिला पोलिस रेश्मा हाके (22), वर्षा दुर्वे (23), मोहिनी लाठकर (22), मंगला दांडेगावकर आदी जखमींना नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रात्री दाखल करण्यात आले. या जखमींची सहायक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी विचारपूस केली. रमेश अस्वरे, पोलिस जीपचालक कांबळे यांचाही जखमीत समावेश आहे. संस्थेतील जखमी शिक्षकांची नावे मिळू शकली नाही.