आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरच्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या, चिठ्ठीतून उलगडले आत्महत्येचे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - सासऱ्याकडून होणारा विनयभंग व कुटुंबातील सदस्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना परळी शहरातील भीमनगर येथे गुरुवारी दुपारी घडली. विवाहितेच्या मृतदेहाजवळ चिठ्ठी आढळून आल्याने आत्महत्येचे कारण समोर आले आहे.  
शहरातील भीमनगर येथील अंजली धम्मपाल वैद्य (२४) या विवाहितेने  गुरुवारी दुपारी तीन वाजता  दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. शुक्रवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्याअगोदर करण्यात आलेल्या तपासणीत  चिठ्ठी सापडली. सासऱ्याने विनयभंग केला असून  लग्नात हुंडा दिला नसल्याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचे विवाहितेने या चिठ्ठीत म्हटले आहे.  अंजलीची आई लताबाई साहेबराव सुरवसे यांनी परळी शहर पोलिसात  दिलेल्या तक्रारीवरून पती धम्मपाल वैद्यसह सासरा सुंदरराव वैद्य, सासू अन्नपूर्णा वैद्य, दीर संघपाल वैद्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अमरावती जिल्ह्यातील कोरडा येथून अंजलीचे माहेरचे लोक आल्यानंतर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  
बातम्या आणखी आहेत...