आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिपेवडगावच्या शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज - कर्जबाजारीपणाला कंटाळून  उंदरी (ता. केज) येथे वृद्ध शेतकरी दांपत्याने आत्महत्या केल्याच्या घटनेला आठवडा होत नाही तोच दिपेवडगावच्या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली.  
 
चंद्रकांत बंकट गुळभिले ( ३३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. चंद्रकांत यांच्या नावे अडीच एकर जमीन आहे.  गत चार वर्षांपासूनच्या कोरड्या दुष्काळाने शेतातून काहीच उत्पन्न हाती लागले नाही. कर्ज काढून दरवर्षी पेरणीवर खर्च केला. मात्र तो खर्चही निघाला नाही. त्यामुळे ते कर्जबाजारी होत गेले. गतवर्षी एक एकर जमीन विकून  त्यांनी काही कर्ज फेडले. हाताला दुसरा कामधंदा नसल्याने कुटुंबाची गुजराण करणे अवघड झाले होते. म्हणून त्यांनी प्रवासी वाहतूक करण्यासाठी अंबाजोगाई येथील  एका खासगी फायनान्सकडून अडीच लाख रुपये कर्ज घेऊन  जीप  घेतली. काही दिवस जीप चालवून त्यांनी उदरनिर्वाह केला. मात्र या व्यवसायातही त्यांना यश आले नाही. त्यामुळे जीपचे हप्ते थकत गेेले आणि कर्जाचा बोजा वाढला.  उर्वरित दीड एकर जमीन  पिकत नसल्याने त्यांना नैराश्य आले होते. हप्ते व कर्ज कसे फेडायचे  या चिंतेत त्यांनी शनिवारी पहाटे शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास  घेतला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.  
 
गेवराईत तरुणाचा गळफास   
गेवराई शहरातील गणेशनगर भागात २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी समोर आले. अमोल परशुराम राठोड असे मृत तरुणाचे नाव असून राहत्या घरी त्याने गळफास घेतला.
बातम्या आणखी आहेत...