आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
रांजणी  - झाडाला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना परतूर तालुक्यातील काकडे कंडारी येथे ४ ऑगस्ट रोजी घडली. गोविंद छगन शेळके (२०) असे मृत युवकाचे नाव आहे.  
छगन शेळके हे  कुटुंबासह शेतात राहतात. त्यांना पाच मुले असून मृत गोविंद हा अविवाहित होता. गोविंदने ३ ऑगस्ट रोजी दिवसभर शेतात काम करून संध्याकाळी गावात झोपण्यास जातो, असे सांगून निघून गेला. दरम्यान, सकाळी घरातील काही महिला बाहेर गेल्या असता लिंबाच्या झाडाला गोविंद शेळके यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर गोविंद यास रांजणी येथील रुग्णालयात नेले असता मृत घोषित केले. या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...