आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणासाठी पैसे नसल्याने बार्शीत बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
बार्शी -  बारावीच्या शिक्षणासाठी आर्थिक जुळवाजुळव होत नसलेल्या गुणवंत विद्यार्थ्याने गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे. अजिंक्य अरविंद देवकर (आरेवाडी- ढालगाव ता. कवठे महंकाळ जि.सांगली, सध्या रा.सुभाष नगर बार्शी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.  
 
अजिंक्यला घरच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण कसे पूर्ण करायचे, याची विवंचना होती. आईकडे शिक्षणासाठी  तो पैशांचा हट्ट करीत होता. जात पडताळणी प्रमाणपत्रातही नातेवाईक अडथळे आणत असल्याने अजिंक्यने आईसह मित्रांकडे भावना व्यक्त केली होती. बारावी संगणक शास्त्र विभागात त्याचे शिक्षण सुरू होतो त्याला यावर्षी दहा हजारांच्या शैक्षणिक शुल्काची आणि खासगी शिकवणीकरिता ५४ हजार रूपयांची गरज होती. अजिंक्यच्या आई मीरा देवकर म्हणाल्या, ‘ वर्षापूर्वी दहावीत अजिंक्य ९३.८० गुण मिळवून शाळेत प्रथम आला होता. 
बातम्या आणखी आहेत...