आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी : दुबार पेरणीच्या संकटाने युवकाची अात्महत्या, चिकलठाणा ( खुर्द ) येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
परभणी  - चिकलठाणा खुर्द (ता.सेलू) येथील एका युवकाने दुबार पेरणीचे संकट व बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून गुरुवारी (ता.१३) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन अात्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद सेलू पोलिस ठाण्यात झाली.  
 
योगेश बालासाहेब थोंबाळ (२०) असे मृताचे नाव आहे. तो चिकलठाणा (खुर्द ) येथील रहिवासी आहे. पावसाअभावी शेतात पेरणी केलेले बियाणे वाया गेले. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट व मोरेगाव (ता.सेलू ) येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेचे कर्ज तसेच सेलू येथील स्टेट बँक अाॅफ हैदराबाद शाखेचे वडिलांच्या नावावर घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्याने अात्महत्या केली. मुलगा शेतातून घरी परतला नाही म्हणून घरातील मंडळीने योगेशचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यांना रात्री अकराच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत अाढळून अाला. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात अाणण्यात अाला. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक
अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार अविनाश बनाटे, संजय जाधव करत अाहेत.
 
सेलू तालुक्यातही तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
सेलू  -
तालुक्यातील चिकलठाणा येथील योगेश बाबासाहेब थोंबाळ (२०) यांनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. योगेश बाबासाहेब थोंबळकडे  मोरेगाव येथील परभणी  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वीस हजार व सेलू येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेचे कर्ज होते. या कर्जाला तसेच नापिकीला  कंटाळून  आत्महत्या केली. या घटनेची फिर्याद रमेश केशवराव थोंबाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक जाधव, अनंता थोरवट, बीट जमादार एस. एस. जाधव करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...