आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावळदबारा येथेही शेतकऱ्याची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सावळदबारा- सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे रविवारी नैराश्यातून एका कर्जबाजारी शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. अशोक किसन गावडे (४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तिबार पेरणी व कर्जबाजारीपणा आणि त्यातच त्यांच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यांच्या उपचारावरचा खर्च तसेच नापिकी यामुळे नैराश्यातून अशोक गावडे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.