आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ तरुणाचा भिंतीवर डोके आपटल्याने मृत्यू; खुनाचे गूढ 5 दिवसांनंतर उकलले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव- येथील  पशुचिकित्सालय आवारात  झालेल्या खुनाचे  गूढ उकलण्याचे  सोयगाव पोलिसांसमोर आव्हान होते. घटनेच्या पाचव्या दिवशी हे गूढ उककले असून  पोलिस तपासात हा खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. उसणवारीच्या रकमेवरून झालेल्या हाणामारीत भिंतीवर डोके आपटल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.  या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.   

 श्याम सुरेश  इंगळे  (३५, रा. नारळीबाग)  याचा घातपात झाल्याची तक्रार मृताच्या आई यमुनाबाई सुरेश इंगळे यांनी सोयगाव पोलिस स्टेशनला दिली होती. या तक्रारीची सहायक पोलिस निरीक्षक सुजित बडे यांनी गंभीर दखल घेत तपासाची चक्रे फिरवून गणेश लाठे, विक्रम फुसे  या दोघा आरोपींविरुद्ध बुधवारी (दि. १) खुनाचा गुन्हा दाखल करीत एकास बुधवारीच अटक केली. यातील दुसरा  फरार आरोपी विक्रम फुसे यालाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती सपोनि. सुजित बडे यांनी दिली.  अटकेत असलेल्या गणेश सुखदेव लाठे (३०) रा. सोयगाव  याने उसनवारीच्या पैशाच्या वादातून  पशुचिकित्सालयाच्या आवारात हाणामारीदरम्यान  श्याम इंगळे यांचे डोके भिंतीवर आपटले होते. त्यामुळे  अती रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, असा कबुली जबाब दिला आहे.   आरोपी गणेश सुखदेव लाठे (३०) यास सोयगाव न्यायालयात हजर केले, असता त्यास न्यायमूर्ती एस. एस. साळवे यांनी शनिवार (दि.४) पर्यंत  दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बातम्या आणखी आहेत...