आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला वाहकाच्या घरी दरोडा; कुटुंबास कोंडले, आश्रमातही धुमाकूळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
धारूर - वीजपुरवठा खंडित झाल्याची संधी साधत सहा दरोडेखोरांनी शिक्षक कॉलनीतील एसटी वाहक मनीषा  दिलीप बडे यांच्या घरावर दरोडा टाकून २ लाख ३२ हजार रुपयांचा  मुद्देमाल लांबवल्याची घटना  शुक्रवारी पहाटे २ वाजता घडली.  दरोडेखोरांनी बडे कुटुंबीयास खोलीत कोंडून टाकले. शेजाऱ्याने सकाळी या कुटुंबाची सुटका केली.   
 
रात्री एक वाजता जोरदार वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. काही वेळानंतर  दरवाजाला  धडक देऊन सहा दरोडेखोर त्यांच्या घरात शिरले. त्यांच्याकडे लोखंडी गज व कत्त्या होत्या. दरोडेखोरांना पाहून बडे कुटुंबीयांनी आरडाओरड केली तेव्हा त्यांना जिवे मारण्याची धमकी देत ४७ ग्रॅम सोने, रोख ९९ हजार व मोबाइल  असा एकूण २ लाख ३२ हजारांचा  मुद्देमाल लांबवला.
 
आश्रमातही धुमाकूळ
आष्टी - आष्टी-जामखेड मार्गावरील महानुभव पंथाच्या निवासी आश्रमात चोरांनी अडीच तास धुमाकूळ घालत  एक लाखाचा माल लांबवला. शांताबाई जामोदेकर व जनकाईसा धाराशिवकर यांना मारहाण करून चोरटे पसार झाले.
बातम्या आणखी आहेत...