आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत 15 घरे, उस्मानाबादेत सांजा चौक क्षणात रिकामा..!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली शहरातील बळसोंड भागातील शिक्षक कॉलनीतील उद्ध्वस्त घर. - Divya Marathi
हिंगोली शहरातील बळसोंड भागातील शिक्षक कॉलनीतील उद्ध्वस्त घर.
सिलिंडरने पेट घेतल्याने नागरिकांनी गाठले मैदान 
हिंगोली - शहरातील बळसोंड भागातील शिक्षक कॉलनीतील एका घरात सिलिंडरच्या टाकीने पेट घेतल्याने घडलेल्या अपघातात गृहोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. सिलिंडरच्या टाकीचा स्फोट होण्याच्या भीतीने काही वेळातच शेजारच्या १० ते १५ घरातील लोकांनी घरे सोडून मैदान गाठले.  

शहरातील शिक्षक कॉलनी भागातील सेवानिवृत्त शिक्षक दिगंबर सखाराम नाईक यांच्या पत्नी सकाळी १०.३० च्या सुमारास स्वयंपाक करीत होत्या. सिलिंडरमधून शेगडीला जोडलेल्या नळीतून गॅसगळती झाल्याने नळीने पेट घेतला. त्यानंतर सिलिंडरनेही पेट घेतला आणि घरातील सर्वांनी घर सोडले. नाईक यांचे कुटुंबीय घराबाहेर येऊन सिलिंडरने पेट घेतल्याचे सांगताच शेजाऱ्यांनीही घर सोडले. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्याचे पीआय मधुकर कारेगावकर व अग्निशमन दलाला माहिती मिळाल्यावर पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सिलिंडर घराबाहेर आणून विझविले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सिलिंडरच्या भडक्याने घरातील बहुतांश वस्तू जाळून खाक झाल्या. त्यात घरातील इलेक्ट्रिकल वस्तूही जळाल्या. या घटनेत नाईक यांचे ३ लाखांचे नुकसान झाले असून याबाबत ग्रामीण पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा, ट्रकमधील रसायनाचा पिंप फुटला, अनर्थ टळला...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...