आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रिणीसोबत बोलत बसणे पडले महागात, तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 लातूर  - लातुरात राहणारा तरुण आपल्या मैत्रिणीसह शहराबाहेर फिरण्यासाठी गेला असता त्याला दोघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेमुळे एकांतात फिरायला जाणाऱ्यांच्या मनात  भीतीचे वातावरण पसरले आहे.  
 
कीर्तिकुमार किरणप्पा रासुरे (२४, रा. आझाद चौक, लातूर) असे लुटण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रासुरे हा शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या मैत्रिणीसह शहराजवळ असलेल्या बारा नंबर पाटीवर फिरायला गेला होता. हे दोघे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बसले असता मोटारसाकलीवरून (एमएच २४, एएन ७६४९) दोन तरुण आले. त्यांनी कीर्तीकुमार व त्याच्या मैत्रिणीला चाकूचा धाक दाखवला.
 
 शिवाय रासुरेवर चाकूने वार करण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्याने तो चुकवला. त्यानंतर चोरट्यांनी कीर्तिकुमारकडे असलेला नोकिया कंपनीचा मोबाइल व त्याच्या मैत्रिणीच्या गळ्यातील सात ग्रॅमचे सोन्याचे गंठण घेऊन पसार झाले.  
 
चोरट्यांनी एकूण २७ हजारांचा ऐवज लुटून नेला. 
कीर्तिकुमारने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या दुचाकीचा क्रमांक मिळाला असला तरी अद्याप त्यांचा सुगावा लागला नाही. तपास पोलिस उपनिरीक्षक इंगेवाड करत आहेत. शहरात सोनसाखळी हिसकावणे, दुचाकी चोरणे आदी गुन्हे सर्रास घडत आहेत. 
 
रिक्षावाल्याची चौकशी  
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून महिला अाॅटोत बसून नातेवाइकांच्या घरी जात असताना रविवारी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मांडीवर ठेवलेली पर्स पळवली होती. याप्रकरणी पोलिसांनी रिक्षावाल्याकडे चौकशी करून त्याला सोडून दिले. अहमदनगर येथील अनसूया व्यवहारे या रिक्षातून घरी जात होत्या. त्यांच्या पर्समध्ये पाच तोळ्याचे गंठन, मोबाईल, घड्याळ व रोख रक्कम मिळून एक लाख ६२ हजारांचा ऐवज होता. पाठीमागून आलेल्या तरुणांनी चालत्या रिक्षातून त्यांची पर्स हिसकावून पसार झाले. 
बातम्या आणखी आहेत...