आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहाटे पाच वाजता अपघात, जळगावहून अकरा वाजता क्रेन आले; 7 तास घाटात वाहतूक ठप्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा - शुक्रवारी रात्री नादुरुस्त ट्रकवर समोरून येणारा ट्रक अादळून झालेल्या अपघातामुळे अजिंठा घाटात सुमारे सात तास वाहतूक पूर्णपणे बंद होती. जळगाव- औरंगाबाद मार्ग घाटात बंद झाल्याने दोन्ही बाजूने सुमारे आठ-आठ कि.मीपर्यंत रांगा लागल्या होत्या. पहाटे पाच वाजता घाटात मधोमध अपघात झाला होता. या अपघातात दोन जण किरकाेळ जखमी झाले. त्यानंतर सकाळी ११ वाजता जळगावहून आलेल्या क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. परंतु वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी सुमारे तीन तासांचा कालावधी लागला. त्यामुळे वाहतूक पूर्ववत होण्यासाठी दुपारी दोन वाजले होते.

अजिंठा घाटात घोडी पटांगणाच्यावर मक्याचा अजिंठ्याकडे येणारा ट्रक (क्र. एम.एच २८ बी. ८०५५) शुक्रवारी रात्रीपासून नादुरुस्त उभा होता. त्यातच औरंगाबादहून जळगावकडे चिंच घेऊन जाणारा ट्रक (जी.जे. १९ यू ३४५२) हा त्याला समोरून धडकला. त्यामुळे अपघातात गुजरात पासिंगच्या ट्रकवर असलेले रवी भाई (४५), प्रताप अर्जुन (३५ दोन्ही रा.गुजरात) यांचे पाय, हात फ्रॅक्चर झाले. 

या जखमीवर अजिंठा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून औरंगाबादकडे पाठविण्यात आले. वाहतूक व्यवस्था सहायक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे, फाैजदार अर्जुन चोधर, अनंत जोशी, अजय मोतिंगे, दत्तात्रय मोरे, अजित शेकडे, रवी भरती, रवी बोर्डे यांनी तर फर्दापुरातील काही पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान अजिंठा गावातून एक वऱ्हाड लग्नासाठी खानदेशला चालले होते. तेही उशिरा गेले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
>वाहतूक पोलिस आले दहा वाजता 
>दुचाकीवरून विनामूल्य सेवा 
​>वरात अडकल्याने तीन तास उशिरा लागले लग्न...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...