आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापुरात सहकार, कृषी मंत्र्यांच्या पुतळ्याला ‘जोडे’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर- हमी भाव खरेदी केंद्रावर जाचक अटी लादून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करत तुळजापूर येथील बाजार समितीच्या आवारात राज्याच्या सहकार व कृषी मंत्र्यांच्या पुतळ्याला जोडे मारून या  पुतळ्यांचे दहन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी   हे आंदोलन करण्यात आले.  

बाजार समिती आवारात तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हमी भाव खरेदी केंद्रासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी हमी भाव केंद्रावरील जाचक अटी रद्द कराव्यात, शेतकऱ्यांचा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच महावितरणकडून सुरू असलेली शेतकऱ्यांची कृषीपंपाची वसुली तातडीने थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  निवेदनावर जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जगदीश पलंगे, दुर्वास  भोजने, शहाजी जगदाळे, विष्णू गाटे, विश्वास चव्हाण, चंद्रकांत नरूळे उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...