आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली: हळद चोरली म्हणून पारधी समाजातील तिघांना मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- तालुक्यातील खरबी येथे हळद चोरीच्या कारणावरून पारधी आदिवासी समाजातील एका बालकासह इतर दोन तरुणांना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. पांडुरंग मचल्या पवार (१५), मंगल भुराजी काळे (२५) आणि सीताराम सखाराम काळे (२४) अशी मारहाण झालेल्या तरुणांची नावे आहेत. 

याबाबत हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. परंतु ग्रामीण पोलिस ठाण्याचे पीआय मधुकर कारेगावकर यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी खरबी येथे पारधी समाजातील तिघांना मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यावर गावात पाठवण्यात आले होते. तसेच त्यानंतर पोलिसांना जखमी दाखल असलेल्या सामान्य रुग्णालयातही पाठवण्यात आले होते. परंतु घटनेतील पीडितांनी अद्याप फिर्याद दिली नाही. 

याबाबत खराबी येथील पारधी समाजातील तरुण राम पवार यांनी सांगितले की, शितोळे  आडनावाच्या व्यक्तीच्या शेतात आमच्या तरुणांना मारहाण झाली आहे. याबाबत उद्या फिर्याद देण्यात येणार आहे, असेही राम पवार याने सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...