आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलक फाडल्याने दोन गटांत दंगल, 47 जणांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - तालुक्यातील भालोद येथे राष्ट्रपुरुषाचे छायाचित्र असलेला फलक फाडल्याने शनिवारी दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांतील ४७ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी २७ जणांवर अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा समावेश आहे. दरम्यान, सुमारे ३०० ते ४०० जणांच्या जमावाने संपूर्ण गावातील दुकाने बंद केली. काही ठिकाणी फलक, साहित्याची तोडफोडदेखील झाली. मात्र, पोलिस आणि लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने तणाव निवळला. भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलसमोरील वीज खांबावर राष्ट्रपुरुषाचे छायाचित्र असलेला फलक लावला होता.  सकाळी ७ वाजता हा फलक फाटलेल्या अवस्थेत दिसला. यानंतर ३०० ते ४०० जणांच्या जमावाने घटनेचा निषेध म्हणून गावातील सर्व दुकाने बंद केली. मात्र, जमावापैकी काहींनी दूध उत्पादक संघ, आयडीबीआय एटीएम आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या फलकासोबत काही दुकानात नासधूस केली. भालोद बसस्थानकापासून हिंगोणाकडे जाणारा रस्ता पाच तास बंद केला.