आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रामाणिकतेचा झरा आजही जिवंत; रुग्णाची गहाळ पावणेतीन लाखांची रक्कम नातेवाइकांना सुपूर्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा- फसवेगिरी व भ्रष्टाचार बोकाळला असताना प्रामाणिकपणाचा झरा आजही जिवंत असल्याचा प्रत्यय किल्लारी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत नाईचाकूर येथील अमोल पवार यांच्या माध्यमातून आला.   


माहितीनुसार औसा तालुक्यातील सिरसल पाटी येथे १५ नोव्हेंबरला अपघात झाला होता. त्यात जावेद शेख, अखीव शहा चैतन शहा मकानदार (रा. उमरगा) हे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु  दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथे हलविण्यात आले. परंतु दोन लाख ८९ हजार रुपये असलेली त्यांच्यासोबतची बॅग दिवसभर ग्रामीण रुग्णालयातच पडून होती. सायंकाळी रुग्णालयातील कर्मचारी अमोल पवार त्यांच्या नाईचाकूर गावाकडे निघाले असता त्यांच्या नजरेस रुग्णालयाच्या आवारात पोत्यात गुंडाळून ठेवलेली बॅग पडली.  त्यांनी सहकारी, नागरिकांना विचारणा केली. परंतु पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत असल्याने या बॅगवर कुणीही हक्क सांगितला नाही. अमोल पवार यांनी पोते उकलून पाहिले असता त्यांना ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा दिसल्या. तेही बॅग ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसमोर कपाटात ठेवून गावाकडे गेले. दुसऱ्या दिवशी अपघातातील जखमींचे नातेवाईक ती बॅग शोधण्यासाठी किल्लारी येथील ग्रामीण रुग्णालयात पोहाेचले. या वेळी अमोल पवार यांनी सर्वप्रथम आलेल्या नातेवाइकांची खात्री व ओळख पटवून घेतली. त्या अपघातात जखमी झालेल्या जावेद शेख यांच्या पत्नी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पैशांची बॅग त्यांच्याकडे सुपूर्द केली.    

 

अमोल पवार यांचे मानले शेख कुटुंबीयांनी आभार 
अपघातात जखमी जावेद शेख यांच्या पत्नी मुमताज शेख, मुस्तफा कवठेकर, शशी कुमार तेवर (सर्व रा. उमरगा) यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी सचिन कदम, गुलाम शेख, जयराम गायकवाड, आंनद गायकवाड, गणेश पाटील यांच्या उपस्थितीत बॅग खोलून बघितल्यावर त्यात दोन लाख ८९ हजारांची रक्कम आढळली. मुमताज शेख व सोबत आलेल्या नातेवाइकांकडे रक्कम सुपूर्द करण्यात आली. गहाळ झालेली रक्कम परत केल्याबद्दल अमोल पवार यांने शेख कुटुंबीयांनी आभार मानले. 

बातम्या आणखी आहेत...