आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"वैद्यनाथ'ची निवडणूक; ४० उमेदवार रिंगणात, १५ उमेदवारांनी घेतली माघार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकीत २० जागांसाठी ४० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५ जणांनी माघार घेतली आहे.

२१ जागांसाठी ९६ जणांनी १२१ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्जांच्या छाननीत पंडितअण्णा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह १७ जणांचे २१ अर्ज बाद झाले होते. १० एप्रिल रोजी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. सोमवारी २३ उमेदवारांनी माघार घेतली. बुधवारी शेवटच्या दिवशी १५ जणांनी अर्ज मागे घेतले असून आजपर्यंत एकूण ३९ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
कारखान्यासाठी २१ संचालक निवडूण द्यावयाचे असतात. परंतु सेवा सहकारी संस्था मतदारसंघात तीनच मतदार आहेत. ज्येष्ठ संचालक पंडितअण्णा मुंडे व विद्यमान उपाध्यक्ष नामदेव अघाव यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने सूचक व अनुमोदक मिळू न शकल्याने त्या जागेवरील निवडणूक रद्द झाली. ४० उमेदवार असून भाजपने मंत्री पंकजा मुंडे, यशश्री मुंडे, आमदार आर.टी.देशमुख, फुलचंद कराड, विद्यमान उपाध्यक्ष नामदेव अघाव यांना उमेदवारी दिली आहे.

अशी हाेणार लढत
पांगरी, नाथ्रा, परळी, सिरसाळा अाणि धर्मापुरी मतदारसंघांत प्रत्येकी तीन जागांवर प्रत्येकी सहा उमेदवारांमध्ये लढत अाहे. अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघातील एका जागेसाठी दाेन उमेदवार मैदानात अाहेत. महिला राखीवमध्ये दाेन जागांवर चार तर इतर मागास अाणि भटक्या विमुक्तांच्या एक-एक जागेसाठी प्रत्येकी दाेन-दाेन उमेदवार अाहेत.