आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारज: सरपंच वगळता ग्रामसभेला सर्व सदस्यांनी मारली दांडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गारज - वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव खुर्द येथील सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून नऊपैकी चार सदस्य आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असून लवकरच ग्रामपंचायतीची निवडणूक लागण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत याचे पडसाद उमटले होते. नऊपैकी ग्रामसभेला केवळ सरपंच हजर होते, तर सर्वच सदस्य सभेला गैरहजर असल्याने सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी सभा काही मिनिटांतच आटोपती घेत औपचारिकता पूर्ण केली. यापुढेही असाच कारभार राहिल्यास कोणत्याही ग्रामसभेला हजेरी लावणार नसल्याचा पवित्रा सर्व सदस्यांनी घेतला आहे.  
 
बाभूळगाव खुर्द येथील ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट कारभार होत असल्याने हे चार सदस्य राजीनामा देणार आहेत. प्रत्येक कामाच्या वेळी विश्वासात न घेणे, मासिक सभेत न बोलावताच प्रोसिडिंग बुकवर बनावट स्वाक्षऱ्या करून बिले उचलणे, घरकुलांच्या याद्यांमध्ये खऱ्या लाभार्थींना वगळून धनदांडग्या व मर्जीतील लोकांच्या नावांचा समावेश करणे, वारंवार सूचना देऊनही पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन न करणे आदी गंभीर बाबींमुळे ग्रामपंचायतीचे चार सदस्य राजीनामा देण्याच्या तयारी असून याचा परिणाम आज झालेल्या ग्रामसभेवर दिसून आला.
बातम्या आणखी आहेत...