आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वसुंधरेची जिद्द, तावडेंनी मिळवून दिला वसतिगृह प्रवेश; शिकण्याची इच्छा अखेर झाली पूर्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- तिने मुंबईत अकरावीला प्रवेश घेतला खरा, मात्र त्यासाठी होणारा मोठा खर्च लक्षात घेऊन पुन्हा गावी परतण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी होस्टेल प्रवेशासाठी ती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही भेटली. त्यांनी हतबलता दर्शवल्यान ती परतूरला परतली. मात्र शिकण्याची जिद्द तिला स्वस्थ बसू देत नव्हती.  ती पुन्हा तावडेंना भेटली व आपली परिस्थिती सांगितली. यावेळी मात्र तिची जिद्द पाहून  तावडेंनी  सावित्रीबाई फुले वसतिगृहात  स्वत: फाेन करत तिला प्रवेश निश्चित करून दिला. 


ही कथा आहे बांद्रा येथील मुंबईच्या सेंट अॅन्ड्रयूज कॉलेजमध्ये कला शाखेत शिकत असलेल्या वसुंधरा तांगडे हिची. ती परतूरची (जि. जालना) रहिवाशी. मुंबईला शिकण्यासाठी गेल्यावर तेथे रुम भाडे, खानावळ आणि शिक्षणावर मोठा खर्च होऊ लागला.  वडिलांची ओढाताण लक्षात घेऊन तिने गावी परतण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी होस्टेलला प्रवेश मिळावा म्हणून तिने खूप प्रयत्न केलेे. मात्र  यश मिळत नसल्याने  विशेष बाब म्हणून तरी प्रवेश द्यावा, अशी विनंती करण्यासाठी ती मंत्रालयात गेली. शिक्षणमंत्री तावडे यांनी सावित्रीबाई फुले वसतिगृहासाठी आलेले अर्ज व इतर प्रक्रियेची माहिती देऊन हतबलता दर्शवली. निराश होऊन ती दिवाळीसुट्यांत गावी आली. वडील राजुकमार तांगडे यांना तिने आपण मुंबईला जाणार नाही हे स्पष्ट सांगितले. ‘तू काळजी करू नकोस, मी तुझ्या शिक्षणाचा खर्च कसाही भागवेन’ असे वडिलांनी तिला सांगितले.  मात्र शिकण्याची जिद्द तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिने विशेष बाब म्हणून वसतिगृह प्रवेशाची संपूर्ण माहिती घेतली. १४ नोव्हेंबरला पुन्हा तावडेंच्या दालनात धडकली.   तिची व्यथा,  संभाषण कौशल्य  पाहून  तावडे यांनी स्वत: फाेन करत वसुंधराला सावित्रीबाई फुले वसतिगृहात प्रवेश मिळवून दिला.   


माझा मुंबईत राहण्याचा खर्च वडिलांना पेलवणारा नव्हता. मला होस्टेलला प्रवेश मिळाला नसता तर शिक्षण साेडून परतण्याशिवाय पर्याय नव्हता, असे  वसंुधरा हिने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. 

 

शिकण्याची जिद्द अावडली   
वसुंधरा भेटली तेव्हा तिने आपल्याकडे मंत्री अर्जुन खोतकर यांची शिफारस असल्याचे सांगितले. अाधीच माझ्याकडे शिफारशी संदर्भातील ३६०० अर्ज अाले हाेते. तरी केवळ वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने तिचे शिक्षण अर्धवट राहू नये असे मला वाटत हाेते.  बालदिनाला वसुंधरा पुन्हा भेटायला अाली. तिची शिकण्याची जिद्द अाणि ग अात्मविश्वास मला अावडला. म्हणून तिला वसतिगृहात प्रवेश देण्यासाठी मी फाेन केला.
- विनाेद तावडे, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र. 

 

बातम्या आणखी आहेत...