आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Veterinary Medical College Students Movement In Parbhani

पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे परभणीत बूटपॉलिश करून आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांच्या स्टायपेंडसह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी येथील राज्य पशुवैद्यकीय विद्यार्थी संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. निदर्शने करीत नागरिकांचे बूट पॉलिश करून देऊन अभिनव पद्धतीने आंदोलन केले. शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे पशुवैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांवर बूट पॉलिश करण्याची वेळ येते की काय, असा संदेशच या विद्यार्थ्यांनी दिला.

पशुवैद्यकीय पदवी शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आंतरवासीय निर्वाह भत्ता अत्यंत कमी करून तो प्रतिमहा १२ हजार रुपये करण्यात यावा, पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना मासिक निर्वाह भत्ता १५ हजार रुपये देण्यात यावा या दोन प्रमुख मागण्या मांडताना संघटनेने देशाच्या इतर राज्यांतील विद्यापीठांत देण्यात येत असलेल्या भत्त्यांची माहिती दिली. केवळ महाराष्ट्रात अत्यंत कमी असा स्टायपेंड दिला जातो. पदवी शिक्षणांतर्गत सहा महिने कालावधीच्या एका सत्रासाठी आंतरवासीय (इंटर्नशिप) अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या विविध संस्थांकडे पाठवण्यात येते. या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये केवळ २८५० रुपये प्रतिमहा भत्ता दिला जातो. हे विद्यार्थी अनेक शेतकरी, अल्पभूधारक, कामगार व मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले असतात. एवढ्या कमी रकमेमध्ये त्यांचा खर्च भागत नाही. अशीच स्थिती पदव्युत्तर
पदवीच्या विद्यार्थ्यांची आहे.

पशुवैद्यकीय पदवीच्या विद्यार्थ्यांना अंतिम सत्रात दिला जाणारा आंतरवासीय अभ्यासक्रमासाठीचा (इंटर्नशिप) भत्ता

महाराष्ट्
{(नागपूरवगळता) - २,८५० रुपये
{ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर - चालू वर्षी ६,९०० रुपये, २०१५ नंतर - १२,००० रुपये

परराज्यात
Á ओडिशा युनि. आॅफ अॅग्रिकल्चर अँड टेक्नॉलाॅजी - ८,००० रुपये
Á कर्नाटक व्हेटर्नरी, अॅनिमल अँड फिशरीज सायन्सेस युनि.-११,००० रुपये
Á लाला लजपतराय युनि. आॅफ व्हेटर्नरी अँड अॅनिमल सायन्सेस, हरियाणा - १२,००० रुपये
Á वेस्ट बंगाल युनि. आॅफ अॅनिमल
अँड फिशरीज सायन्सेस,
कोलकाता - ७,५०० रुपये
पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी दरमहा निर्वाह भत्ता
Á महाराष्ट्रात - काहीच नाही
Á इतर राज्यांत - ओडिशा - १०,००० रुपये
Á हरियाणा - ८,००० ते १२,००० रुपये
Á उत्तर प्रदेश - ८,००० रुपये
Á बिकानेर, राजस्थान - ५,००० रुपये
Á कर्नाटक - १०,००० रुपये