आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृतीयपंथीयांसह नवीन मतदारांची हाेणार मतदार यादीत नोंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्हाभरामध्ये २०१६ अखेर व २०१७ च्या प्रारंभाला नगरपालिका अाणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार अाहे. यातच नवीन मतदारांची नाेंदणी वाढावी यासाठी भारत निवडणूक अायाेगाकडून अाॅगस्ट २०१६ अखेरपर्यंत सहा महिन्यांसाठी माेहीम राबवण्याचे निर्देश दिले अाहेत. यात तृतीयपंथीय, वेश्याव्यवसायातील व्यक्तींसह नवीन युवकांची नाेंदणी केली जाणार अाहे.
बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या १८ लाख ६० हजार १४७ अाहे. यात अाॅदर केवळ २ मतदारांची नाेंदणी अाहे. अशीच स्थिती इतत्र असल्याने भारत निवडणूक अायाेगाने चालू वर्षात तृतीयपंथी व वेश्याव्यवसायातील व्यक्तींची मतदार यादीत नाव नाेंदणीसाठी िवशेष माेहीम राबवण्याचे अादेश जिल्हाधिकाऱ्यांना िदले अाहेत. एक मार्च ते ३१ अाॅगस्ट २०१६ दरम्यान जिल्ह्यातील मतदार याद्यांचे शुद्धीकरणाचे काम राबवण्यात येणार अाहेत. यात विशेष करून डबल नावे रद्द करणे, चुकींची दुरुस्ती करणे, अधिक नावे तपासणे त्याचबराेबर जिल्हाभरातील तृतीयपंथीय व वेश्याव्यवसायातील व्यक्तींची नावे मतदार यादीत नाेंदवण्याची प्रक्रिया केली जाणार अाहे, असे निवडणूक उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी सांगितले.

नवीन मतदार नोंदणीचे निर्देश
जिल्हाभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताेंडावर अाल्या असून नवीन युवक व महिला मतदार वाढवण्याबराेबरच तृतीयपंथीय व वेश्याव्यवसाय करणाऱ्यांची नोंदी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व मतदार नाेंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अाणि सहायक मतदार नाेंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांना दिले अाहेत.
भाऊसाहेब जाधव, उपजिल्हाधिकारी, निवडणूक
बातम्या आणखी आहेत...