आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी फाउंडेशन: लग्नाच्या एक तास अाधी नवदांपत्यासह वऱ्हाडींचे श्रमदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नाच्या एक तास आधी श्रमदान करताना वध्ू आणि वर. त्यासोबत वऱ्हाडी मंडळींनी श्रमदान केले. - Divya Marathi
लग्नाच्या एक तास आधी श्रमदान करताना वध्ू आणि वर. त्यासोबत वऱ्हाडी मंडळींनी श्रमदान केले.
धारूर - हिंदी चित्रपट अभिनेता अामिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वाॅटर कप स्पर्धेत आम्ला गावाने सहभाग घेतला आहे. या गावात रविवारी ग्रामस्थांबरोबर वधू-वरासह वऱ्हाडी मंडळींनी श्रमदान केले. गावात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाले आहेत. 
 
तालुक्यात बालाघाटाच्या डोंगरपायथ्याशी दोन हजार लोकसंख्येचे आम्ला गाव आहे. वॉटर कप स्पर्धेत उतरल्यापासून या गावात एप्रिलपासून ग्रामस्थ श्रमदानासाठी झपाटून कामाला लागले आहेत. सकाळी सहा ते दहा या वेळेत महिला, पुरुष श्रमदानाचे काम करत आहेत. महिनाभरात श्रमदानातून डोंगर उताराला समतल चर, वृक्ष लागवडीसाठी खड्डे, मातीबांध, बांधबंदिस्ती ही श्रमदानातून कामे करण्यात आली आहेत, तर डोंगर उतारावर खोल चर, नाला खोलीकरण ही कामे यंत्राच्या साहाय्याने करण्यात आली आहेत. 
 
या गावात एप्रिल रोजी गंगाधर पांचाळ यांच्या मंदा नावाच्या मुलीचे लग्न होते. मंदाचा विवाह काळेवाडी येथील अशोक पांचाळ यांच्याबरोबर जुळला होता. लग्नाची वेळ दुपारी साडेबारा वाजण्याची होती. विवाहासाठी तीन तासांचा वेळ असल्याने गावातील महिला, पुरुष श्रमदानासाठी गेले होते. 
 
आपणही गावातील श्रमदान करून वॉटर कप स्पर्धेसाठी खारीचा वाटा उचलला पाहिजे म्हणून वधू -वरासह २५ वऱ्हाडी मंडळींनी सकाळी वाजता एक तास बांधबंदिस्तीच्या कामासाठी श्रमदान केले. यानंतर गावकऱ्यांसह वधू- वर सकाळी १० वाजता गावात पोहोचले. 
 
पाण्याचे महत्त्व समजले 
- सर्वग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व समजले असून श्रमदानाच्या कामासाठी गावातील कोणीच गैरहजर राहत नाही. गावातील पांचाळ कुटुंबाच्या घरी लग्न असतानाही सकाळच्या वेळेत वधू-वरासह काही वऱ्हाडी मंडळी श्रमदानात सहभागी झाली होती.
-अंकुश सोळंके, ग्रामस्थ, आम्ला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...