आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी गळतीचा लातूर पॅटर्न अखेर थांबणार, ४६ किमीची पाइपलाइन अखेर बदलणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - पाणीटंचाईमुळे अख्ख्या देशात चर्चेला आलेल्या लातूर शहरातील पाणी गळतीचा पॅटर्न अखेर थांबण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारच्या अमृत योजनेमधून चार महिन्यांपूर्वी मंजूर झालेली जलवाहिनी बदलण्याच्या योजनेच्या कामाची निविदा स्वीकारण्यात आल्यामुळे लवकरच हे काम मार्गी लागणार आहे.

लातूर शहराला या वर्षीच्या सुरवातीपासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. मांजरा धरणात आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध असतानाही केवळ आणि केवळ लातूर शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांमधील गळतीमुळे आणि सदोष वाहिन्यांमुळे दुपटीपेक्षा जास्त पाणी उचलावे लागत होते. त्यामुळे मांजरा धरणातील पाणी लवकर संपले आणि लातूरकरांच्या नळाचे पाणी बंद झाले. त्यानंतर पाच लाख लोकसंख्येचे हे शहर टँकरवर आले. पाण्यामुळे होणारी भांडणे थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागू केले आणि लातूर देशाच्या नकाशावर आले.
पंतप्रधान कार्यालयाने लक्ष घालून
लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा केला. या सगळ्या समस्येला जेवढे नैसर्गिक संकट कारणीभूत होते
त्यापेक्षाही अधिक कारणीभूत होता तो म्हणजे नियोजनाचा अभाव. लातूर शहरातील अंतर्गत जलवाहिनीला ४० वर्षे उलटून गेल्यामुळे ती अनेक ठिकाणी गंजून खराब झाली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्यामुळे महापालिकेला गरजेपेक्षा दुप्पट पाणी धरणातून उपसावे लागते आणि नागरिकांना पुरवावे लागते. जलवाहिन्यांना व्हॉल्व्ह सिस्टिम नसल्यामुळे शेवटच्या टोकाला पाणी देण्यासाठी सुरुवातीच्या भागाला दिवसभर पाणी सुरूच ठेवावे लागते. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. त्याचबरोबर नळांना मीटर नसल्यामुळे पाण्याचा अमाप वापर करण्याकडे लोकांचा कल आहे. या सगळ्यांवर आता तोडगा निघण्याची चिन्हे आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा, समांतर पाइपलाइन टाकण्यात येणार
बातम्या आणखी आहेत...