आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाई लातूर जिल्ह्यात अन् आढावा बैठक मुंबईत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असतानाही जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या पंकजा मुंडे पाच महिन्यांपासून लातूरकडे फिरकल्याच नाहीत. टंचाई आढावा बैठक घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढण्याऐवजी पंकजा मुंडेंनी शुक्रवारी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून आढावा बैठक घेतली.

लातूर जिल्ह्यात पावसाळ्याच्या सव्वादोन महिन्यांत केवळ ३५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या भरवशावर केलेल्या ५६ टक्के पेरण्या वाया गेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे.

जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न बिकट बनला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले एकहाती खिंड लढवीत आहेत. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी गायब अाहेत. त्यातच लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या गेल्या सहा महिन्यांत लातूरकडे फिरकल्या नाहीत. खरेतर ालकमंत्री पंकजा मुंडे यांनी लातूरमध्ये येऊन टंचाई आढावा बैठक घेणे आवश्यक होते.

त्यामध्ये सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदारांशी चर्चा करून त्यांच्या सूचना ऐकून घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे, एस. बी. स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम यांना मुंबईला बोलावून त्यांच्याकडून माहिती घेतली.