आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील मोर्चात लाखो मराठा बांधव सहभागी होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर  - मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी आदी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत विधान भवनावर सहा मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात लातूर जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार आहेत. तसा निर्धार येथे झालेल्या मराठा क्रांती समितीची बैठकीत करण्यात आला. 
 
मराठा समाजाने तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी लाखोंच्या संख्येत मोर्चे काढले. सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आर्थिक हतबलतेपोटी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांत मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सवलती व आरक्षण नसल्याने युवकांवर संकट ओढवले आहे. 
 
कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाज स्वतंत्र आरक्षण मागत आहे. असे असताना मार्ग काढण्याऐवजी सरकार खोटा प्रचार करून अन्य समाजाला प्रतिमोर्चे काढण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला.  मुंबई मोर्चात लाखोंचा सहभाग नोंदवण्यासाठी तालुकानिहाय बैठका घेण्यात येत आहेत.
 
 त्यासाठी तारीख व वेळही जाहीर करण्यात आली आहे.  मुंबईला जाण्यासाठी समन्वय समित्या स्थापन करणे, मुक्कामाची ठिकाणे, रेल्वेचे वेळापत्रक, संपर्कासाठी फोन नंबर्स, सोशल मीडियाचा प्रभावी वापर, व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करणे आदींवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.
 
बातम्या आणखी आहेत...