आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर: महिला दिनापासून अल्प किमतीत सॅनिटरी नॅपकिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर -   जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने लातूर जिल्ह्यातील ५० शिक्षण संस्थांमध्ये व्हेंडिंग मशीनच्या माध्यमातून अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्ह्यातल्या सर्व दहा तालुक्यांत दहा लाख सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. केवळ ४ हजार रुपयांत व्हेंडिंग मशीन बसणार असून ८ नॅपकीनचा पॅक केवळ २० रुपये व शहरी भागात ९ नॅपकिनचा पॅक ३० रुपयांना उपलब्ध करून दिला जात आहे. 

 आर्ट आॅफ लिव्हिंगने लातूर जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये नदी खोलीकरण, स्वच्छतागृहांची उभारणी, स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी पुढाकार घेतला आहे.  त्याचाच एक पुढचा भाग म्हणून महिला आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वर्षभरापासून महिला आरोग्याच्या दृष्टीने शहरी व ग्रामीण भागात आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून आरोग्य जागृती, प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जात आहे. याचबरोबर विविध शाळा, कॉलेजमध्ये हितगुज स्वरूपात कार्यक्रम करून मुलींच्या समस्या व आरोग्यविषयक अडचणी समजावून घेण्यात आल्या. महिला दिनाचे निमित्त साधून बुधवारपासून ५० शिक्षण संस्थांमध्ये या उपक्रमाला सुरुवात होईल.  भविष्यात जिल्ह्यातील प्रत्येक गावात व प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये व्हेंडिंग मशीन बसवण्याचे ठरवले आहे.  
बातम्या आणखी आहेत...